शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
3
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
5
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
6
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
7
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
8
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
9
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
10
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
11
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
12
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
13
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
14
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
15
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
16
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
17
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
18
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
19
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
20
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."

बँकांनी ‘स्पोर्टस् लोन’द्यावे

By admin | Updated: November 21, 2015 00:23 IST

चंद्रकांतदादा पाटील : शिवछत्रपती पुरस्कार विजेत्यांचा सत्कार

सांगली : अद्ययावत क्रीडा साहित्याअभावी अनेक गुणवंत खेळाडूंना आपली कामगिरी उंचावताना अडथळे येत आहेत. बँका आणि पतसंस्थांनी ‘स्पोर्टस् लोन’साठी आता पुढाकार घ्यावा. त्यासाठी मी स्वत: प्रयत्नशील आहे, असे मत राज्याचे सहकारमंत्री व सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केले. तरूण भारत व्यायाम मंडळाने आयोजित केलेल्या शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेत्यांच्या सत्कार समारंभात चंद्रकांतदादा बोलत होते. ते म्हणाले, खेळाडू आर्थिकदृष्ट्या स्थिर झाला तरच तो चांगली कामगिरी करू शकतो. राज्य सरकारने जागतिक पदक विजेत्या खेळाडूंना थेट नोकऱ्या दिल्या आहेत. त्यामुळे खेळातही उत्तम करिअर होऊ शकते, हे आता पालकांना कळाले आहे. कोल्हापूरची नेमबाज तेजस्विनी सावंतला मी वेळोवेळी व्यक्तीश: सहकार्य केले. खेळाडूंच्या मागे समाजाने उभे राहण्याची गरज आहे. बँका व पतसंस्थांनी होम लोन, कार लोन याप्रमाणे खेळाडूंना अत्यंत कमी व्याजदरात ‘स्पोर्टस् लोन’ उपलब्ध करून दिले पाहिजे. मी सहकार खात्याच्या माध्यमातून यामध्ये स्वत: लक्ष घालणार आहे. यावेळी तलवारबाजी संघटक प्राचार्य एन. एम. भैरट, राष्ट्रीय तलवारबाजी खेळाडू अर्चना लाड, राष्ट्रीय खो-खोपटू युवराज जाधव व राष्ट्रीय सायकलपटू हुसेन कोरबू यांना शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल मान्यवरांच्याहस्ते सन्मानपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. प्राचार्य भैरट यांनी मनोगत व्यक्त केले. उमेश सूर्यवंशी यांनी स्वागत केले. डॉ. सुहास व्हटकर यांनी सूत्रसंचालन केले. महेश पाटील यांनी आभार मानले. याप्रसंगी आ. सुधीर गाडगीळ, आ. सुरेश खाडे, माजी आ. दिनकर पाटील, माजी आ. पृथ्वीराज देखमुख, जिल्हा उपनिबंधक प्रकाश आष्टेकर, जिल्हा क्रीडाधिकारी युवराज नाईक, शेखर इनामदार, मकरंद देशपांडे, गोपीचंद पडळकर, शिवाजी सगरे, प्रमोद जगताप, विजय साळुंखे, पारिसा नागे, प्रकाश सूर्यवंशी आदी उपस्थित होते. (क्रीडा प्रतिनिधी)हुसेन कोरबूला सायकल...अत्यंत गरिबीतून येऊन शिवछत्रपती पुरस्कारापर्यंत पोहोचलेल्या हुसेन कोरबूने पालकमंत्री चंद्रकांतदादांची भेट घेऊन आपली व्यथा त्यांच्यासमोर मांडली. कोणतीही अद्ययावत सायकल नसतानाही हुसेनने सातपेक्षा अधिक राष्ट्रीय सायकल स्पर्धा गाजवल्या आहेत. तो सध्या पुणे-मुंबई या स्पर्धेची तयारीही साध्या सायकलवरच करत आहे. चंद्रकांतदादांना तरूण भारत मंडळाचे उपाध्यक्ष महेश पाटील व पानपट्टी असोसिएशनचे शहराध्यक्ष युसूफ जमादार हे यांनी सांगितले. त्यानंतर चंद्रकांतदादांनी हुसेनला साडेतीन लाख रुपये किमतीची अद्ययावत सायकल देण्याचे कबूल केले.