शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीच्या वाढत्या रेट्यामुळे बँका झाल्या हैराण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 04:38 IST

विधिमंडळ अधिवेशनाच्या तोंडावर कर्जमाफीचा आकडा कुठल्याही परिस्थितीत वाढविण्याचा चंग बांधलेल्या सरकारच्या रेट्यापायी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि राष्ट्रीयीकृत बँकादेखील हैराण झाल्या आहेत.

मुंबई : विधिमंडळ अधिवेशनाच्या तोंडावर कर्जमाफीचा आकडा कुठल्याही परिस्थितीत वाढविण्याचा चंग बांधलेल्या सरकारच्या रेट्यापायी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि राष्ट्रीयीकृत बँकादेखील हैराण झाल्या आहेत. विशेषत: जिल्हा बँकांमध्ये अधिकारी, कर्मचारी रात्री २ पर्यंत राबत असल्याचे चित्र आहे.बँकांच्या अधिकाºयांसोबत मंत्रालयातून बुधवारी झालेल्या एका व्हीडीओ कॉन्फरन्समध्ये अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर दिरंगाईसाठी कारवाई करण्याची धमकी एका ज्येष्ठ अधिकाºयाने दिली. ज्या बँका जलदगतीने कर्जमाफीची कारवाई करणार नाहीत त्यांच्याविरुद्ध कारवाई केली जाईल, असे बजावण्यात आले. तुमच्याकडे शेतकºयांची यादी पाठविली आहे, पैसाही उपलब्ध करून दिला आहे. आता पटकन शेतकºयांच्या कर्ज खात्यात पैसा टाकून त्यांना कर्जमुक्त करा, असा तगादा बँकांकडे लावला जात आहे. आॅनलाइन कर्जमाफीसाठी आधी इनोव्हा कंपनीला कंत्राट देण्यात आले. त्या कंपनीने प्रचंड घोळ घातला. आता ते काम टीसीएसला देण्यात आले आहे. ही कंपनीदेखील सतत सूचनांना भडिमार बँकांवर करीत असते. आयटी कंपन्यांच्या बेपर्वार्ईचा फटका मात्र बँकांना बसत आहे.४१ लाख शेतकºयांना १९५३७ कोटी मंजूरछत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत आतापर्यंत ४१ लाख शेतकरी खात्यांसाठी १९५३७ कोटी रुपये मंजूर झाले असून आता बँकांनी ही रक्कम प्रत्यक्ष शेतकºयांच्या खात्यावर वर्ग करण्यासाठी तत्काळ कारवाई करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या बैठकीत ते बोलत होते. एकही पात्र शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार नाही याची काळजी घ्यावी. त्यासाठी बँकांनी हे काम पंधरा दिवसांत पारदर्शकपणे पूर्ण करावे, त्यांना सहकार विभागाचे तालुका आणि जिल्हास्तरीय अधिकारी मदत करतील. शेवटच्या पात्र शेतकºयाला लाभ मिळेपर्यंत कर्जमाफीची प्रक्रिया अशीच सुरू राहील, असेही ते म्हणाले.कर्जमाफी २४ हजार कोटींची!सुरुवातीला ८९ लाख शेतकºयांना ३४ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी दिली जाईल, असे राज्य सरकारने जाहीर केले होते. तथापि, आता हा आकडा ६९ लाख शेतकºयांपर्यंत खाली आला आहे. त्यामुळे एकूण कर्जमाफी ही २४ हजार कोटी रुपयांपर्यंत असेल, असा अंदाज आहे.

टॅग्स :bankबँक