अलिबाग : पेण तालुक्यातील वरसई येथे मंगळवारी दुपारी भररस्त्यात मिनिडोर रिक्षा अडवून, चाकूचा धाक दाखवून बँक आॅफ महाराष्ट्राची तब्बल २५ लाख रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली.बँक आॅफ महाराष्ट्राच्या पेण शाखेतून ही २५ लाख रुपयांची रोकड एका सुटकेसमध्ये घेऊन, मिनिडोर रिक्षातून बँकेच्या वरसई येथील शाखेत रोखपाल व शिपाई हे घेऊन जात होते. वरसईजवळच्या लॅबगार्ड कंपनीसमोर रिक्षा आल्यावर, पाठीमागून ओव्हरटेक करून दोन मोटरसायकलवरून तिघे जण आले. त्यांनी मिनिडोर रिक्षा भररस्त्यातच अडवली. रिक्षाचालकास चाकूचा धाक दाखूवन, रिक्षाच्या मागील सिटवर बसलेले बँकेचे रोखपाल व शिपाई यांच्याकडील २५ लाख रोख रक्कम असलेली सुटकेस जबरदस्तीने घेऊन ते फरार झाले. घटनेनंतर पेणचे पोलीस निरीक्षक अशोक जगदाळे व कर्मचारी घटनास्थळी तत्काळ पोहोचले. चोरट्यांना शोधण्याकरिता जिल्ह्यात सर्वत्र नाकाबंदी करण्यात आली असून, पोलिसांची गस्तदेखील वाढविण्यात आली असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
बँक आॅफ महाराष्ट्राचे २५ लाख लुटले
By admin | Updated: December 30, 2015 00:57 IST