शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
2
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
3
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
4
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
5
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
6
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
7
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
8
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
9
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
10
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
11
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
12
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
13
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
14
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
15
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
16
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी
17
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
18
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
19
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
20
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 

बँक आॅफ महाराष्ट्रने केले ३४ हजार डेबिट कार्डस् ब्लॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2016 06:00 IST

सार्वजनिक क्षेत्रातील बँक आॅफ महाराष्ट्रने सुरक्षेच्या कारणास्तव खबरदारीचा उपाय म्हणून ३४ हजार डेबिट कार्ड बंद (ब्लॉक) केले आहेत. तथापि, कोणत्याही शाखेच्या ग्राहकाकडून

पुणे : सार्वजनिक क्षेत्रातील बँक आॅफ महाराष्ट्रने सुरक्षेच्या कारणास्तव खबरदारीचा उपाय म्हणून ३४ हजार डेबिट कार्ड बंद (ब्लॉक) केले आहेत. तथापि, कोणत्याही शाखेच्या ग्राहकाकडून अद्याप व्यवहारात फसगत वा संशयास्पद व्यवहार झाल्याची तक्रार आलेली नाही, असे सरव्यवस्थापक (आयटी) नरेंद्र काबरा यांनी सांगितले.बँक आॅफ महाराष्ट्रने २१ हजार व्हिसा आणि १३ हजार रुपे कार्डसह एकूण ३४ हजार कार्डस् ब्लॉक केले आहेत. या बँकेने एकूण ५९ लाख डेबिट कार्डस् जारी केलेले आहेत. ग्राहकांची फसगत होऊ नये, तसेच त्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये, याची खबरदारी घेऊन हे कार्डस् ब्लॉक करण्यात आले आहेत. आम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावर वापर होत असलेले सर्व डेबिट कार्डस् ब्लॉक केले आहेत, असे बँक आॅफ महाराष्ट्रने सांगितले.आंतरराष्ट्रीय स्तरावर वापरासाठी जारी करण्यात आलेले कार्डस् गरज भासल्यास नजीकच्या शाखेतून सक्रिय (अ‍ॅक्टिव्हेट) केले जाऊ शकतात, असे संदेश आम्ही एसएमएस व ई-मेलद्वारे ग्राहकांना पाठविले आहेत, असे काबरा यांनी सांगितले.भारताबाहेर गेल्या एका महिन्यात ज्या ग्राहकांनी कार्डस्चा वापर केला, अशा ग्राहकांकडूनही आम्ही त्यांचे कार्डस् बंद करण्याची परवानगी मागितली आहे. सर्व ग्राहकांना नव्याने मोफत कार्डस् जारी केले जाणार आहेत. कार्डस् बदलून घेण्यासंबंधीचे संदेश त्यांना पाठविले जात आहेत, असे बँक आॅफ महाराष्ट्रने सांगितले.