शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

बँक-कर्ज घोटाळा; मास्टरमाइंडला ईडीने ठोकल्या बेड्या

By admin | Updated: May 4, 2017 05:13 IST

बँक कर्ज घोटाळा प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बुधवारी झूम डेव्हलपर्स कंपनीचा मुख्य संचालक विजय चौधरी

मुंबई : बँक कर्ज घोटाळा प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बुधवारी झूम डेव्हलपर्स कंपनीचा मुख्य संचालक विजय चौधरी याला मुंबईतून अटक केली. त्याच्या कंपनीने मुंबईसह देश-विदेशातील तब्बल २५ बँकांना २ हजार ६५० कोटींचा चुना लावल्याचा आरोप आहे. चौधरी हा अंधेरीत असलेल्या झूम डेव्हलपर्सचा प्रवर्तक आणि मुख्य संचालक आहे. ही कंपनी मुंबई आणि इंदूरमध्ये काम करते. चौधरी आणि त्याच्या कंपनीच्या अन्य संचालक आणि कर्मचाऱ्यांनी युरोपियन बँकांकडून २ हजार ६५० कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. तथापि, कर्जाची रक्कम घेऊन त्याने पलायन केले. या प्रकरणी ईडीने त्याच्याविरुद्ध मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला. त्याने या रकमेतून अमेरिकेतील कॅलिफोर्नियात १२८० एकर जमीन विकत घेतली. जुलै २०१५मध्ये ईडीने या जमिनीवरही जप्ती आणली होती. या प्रकरणात झूम डेव्हलपर्स या कंपनीचा एक संचालक शरद काब्रा याला अटक केली. तो सध्या कारागृहात आहे. विजय चौधरी मात्र पसार झाला होता. अखेर मंगळवारी रात्री तो मुंबईत आल्याची माहिती ईडीला मिळाली. त्यानुसार ईडीने सापळा रचून त्याला बेड्या  ठोकल्या. (प्रतिनिधी)