शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

बंजारा समाजाला हवे एसटी प्रवर्गात आरक्षण

By admin | Updated: July 22, 2016 20:37 IST

राज्यातील बंजारा समाजाच्या राहणीमानाचा अभ्यास करून त्यांचा समावेश अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गामध्ये करावा, अशी मागणी भारतीय बंजारा क्रांती दल संघटनेने केली आहे.

 शिष्टमंडळाने घेतली पंतप्रधानांची भेट

मुंबई : राज्यातील बंजारा समाजाच्या राहणीमानाचा अभ्यास करून त्यांचा समावेश अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गामध्ये करावा, अशी मागणी भारतीय बंजारा क्रांती दल संघटनेने केली आहे. या मागणीचे निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही दिल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष मोरसिंग राठोड यांनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.राठोड म्हणाले की, देशातील ९ राज्यांमध्ये बंजारा समाजाला अनुसूचित जातींचे (एससी), तर ६ राज्यांमध्ये एसटी प्रवर्गाचे आरक्षण मिळत आहे. याउलट महाराष्ट्र ,मध्य प्रदेश आणि उत्तरप्रदेशमध्ये इतर प्रवर्गांत समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे समाजाचे नुकसान होत आहे. राज्यातील एसटी, एससी आणि ओबीसीच्या आरक्षणाला हात न लावता बंजारा समाजासाठी एसटी प्रवर्गात स्वतंत्र आरक्षण देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्राला पाठवण्याची मागणी राठोड यांनी केली आहे. तसे निवेदन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पाटील यांना दिला आहे. त्यानंतर नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह आणि नितीन गडकरी यांनाही मागणीचे निवेदन दिल्याचे त्यांनी सांगितले.देशातील बंजारा समाजाची भाषा, राहणीमान, वेशभुषा, चालीरिती आणि संस्कृती, देवी-देवता एकच असल्याचे संघटनेचे राष्ट्रीय प्रवक्ता ओंकार जाधव यांनी सांगितले. जाधव म्हणाले की, अनुसूचित जमातींसाठी आवश्यक निकषांची पूर्तताबंजारा समाज करतो. वेगळी संस्कृती, गावापासून वेगळे राहणे, भौगोलिक वेगळेपण, समाजापासून विभक्त तांड्यामध्ये राहणे असे सर्व निकष बंजारा समाजात दिसतात. त्यामुळे घटनेप्रमाणे त्यांना प्रत्येक राज्यांत अनुसूचित जाती किंवा जमातींचे आरक्षण मिळायलाच हवे. उत्तरप्रदेशातील राज्य सरकारने केंद्र शासनाला तेथील बंजारा समाजाचा समावेश अनुसूचित जमातींमध्ये करण्याचा प्रस्ताव पाठवला आहे. त्याप्रमाणे येथील राज्य सरकारनेही तसा प्रस्ताव पाठवण्यासाठी केंद्राने चौथा मागासवर्गीय आयोग स्थापन करण्याची मागणी संघटनेने केल्याचे जाधव यांनी सांगितले.