शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

वायुगळतीवर मलमपट्टी!

By admin | Updated: July 21, 2016 05:07 IST

राजूरजवळ टँकरमधून होत असलेली विषारी वायु गळती पूर्णपणे बंद करण्यात ४० तासानंतरही प्रशासनाला यश आलेले नाही.

राजूर (जि.जालना) : भोकरदन तालुक्यातील राजूरजवळ टँकरमधून होत असलेली विषारी वायु गळती पूर्णपणे बंद करण्यात ४० तासानंतरही प्रशासनाला यश आलेले नाही. बुधवारी दुपारी विषारी वायुच्या टँकरचा समोरचा भाग खड्डयात उतरवून तात्पुरती गळती थांबवण्यात आली होती.घटनेनंतर फरार झालेला टँकरचालक निमेश मलिया डावर (रा. बडोदा) यास हसनाबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. अद्यापही टँकर जागेवरच उभे असल्याने ग्रामस्थांवर भीतीचे सावट कायम आहे. सोमवारी रात्री ‘क्लोरो सल्फोनिक’ नावाचा विषारी वायू घेऊन जाणाऱ्या टँकरला अचानक गळती लागली होती. मंगळवारी दिवसभर प्रशासनातील अधिकारी तळ ठोकून होते, मात्र त्यांना वायुगळती रोखण्यात यश आले नाही. प्रशासनाने दुसरा टँकर बोलावून वायूचा टँकर रिकामा करण्याचा प्रयत्न केला मात्र, त्यातही यश आले नाही. मंगळवारी रात्रभर वायू गळती सुरूच होती. हा घातपाताचा प्रकार असावा, असा संशय आल्याने राज्य गुप्तवार्ता विभागाचे पोलीस निरीक्षक शेख यांच्या पथकाने बुधवारी दुपारी पाहणी केली. (प्रतिनिधी)>शेतकऱ्यांचा ‘रास्ता रोको’वायू गळतीमुळे पिकांचे नुकसान झाल्याने राजूर बाजारपेठ बंद ठेवून शेतकऱ्यांनी तीन तास रास्तारोको आंदोलन केले. पिकांचा पंचनामा करून मदत देण्याचे लेखी आश्वासन उपविभागीय अधिकारी हरिश्चंद्र गवळी यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेतले.