शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

दारू दुकानात आता पाणी, खाद्यपदार्थ विकण्यास बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 06:45 IST

दारू दुकानांत पाणी, सॉफ्ट ड्रिंक किंवा खाद्यपदार्थांच्या विक्रीस उत्पादन शुल्क विभागाने बंदी घातली आहे.

डॉ. खुशालचंद बाहेती  मुंबई : दारू दुकानांत पाणी, सॉफ्ट ड्रिंक किंवा खाद्यपदार्थांच्या विक्रीस उत्पादन शुल्क विभागाने बंदी घातली आहे. यासाठी १९५३च्या बॉम्बे विदेशी मद्यविक्री नियमांतील तरतुदींचा आधार घेण्यात आला आहे.यापूर्वी उत्पादन शुल्क विभागाने गेल्या महिन्यात मद्यविक्री करणाऱ्या दुकानांवरील मद्याची जाहिरात करणारे बोर्ड उतरवले होते. त्यासाठीही त्यांनी अस्तित्वात असलेल्याच नियमांचा आधार घेतला होता.दारूच्या दुकानावर फक्त ६० बाय ९० सेंटिमीटर आकाराचा बोर्ड लावता येतो. यावर परवाना क्रमांक व दुकान उघडण्याची व बंद होण्याची वेळ लिहिणे बंधनकारक आहे. या नियमाची अंमलबजावणी न केल्यास कारवाईचा बडगा उगारताच दारू दुकानांवरील मोठमोठ्या दारूच्या जाहिरातींचे फलक काढून घेण्यात आले. आता पुन्हा उत्पादन शुल्क विभागाने नियमांचा आधार घेत दारू दुकानांतून होणाºया पाणी, सॉफ्ट ड्रिंक, सोडा, खाद्यपदार्थ यांची विक्री केल्यास कारवाईचा इशारा दिला आहे.मद्य दुकानात पाणी, सोडा व खाद्यपदार्थ विक्री होत असल्याने ग्राहक दुकानांसमोर उभे राहूनच दारू पितात, अशी तक्रार अनेक निवासी वसाहतींतून होत होती. याला काही प्रमाणात आळा बसेल. आता दारू दुकानांजवळ हातगाड्यांवर या पदार्थांची विक्री होणार नाही यासाठी उपाययोजना करावी, अशीही मागणी होत आहे.