शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

बंदी झुगारून एकबोटे गडावर !

By admin | Updated: November 28, 2014 23:54 IST

गनिमी कावा : पोलिसांनी दोन सहकाऱ्यांसह घेतले ताब्यात

महाबळेश्वर : जिल्हाबंदी आदेश असतानाही प्रतापगड उत्सव समितीचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे शुक्रवारी वेशांतर करून नाट्यपूर्णरीत्या पोलिसांचा प्रचंड पहारा असताना प्रतापगडावर पोहोचले. मात्र, भवानीमातेचे दर्शन घेऊन छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याकडे जात असताना हवालदाराची नजर त्यांच्यावर पडल्याने हा प्रयत्न फसला आणि दोन सहकाऱ्यांसह त्यांना ताब्यात घेण्यात आले.प्रतापगडावर दरवर्षीप्रमाणे यंदाही शासनाच्यावतीने शिवप्रतापदिन साजरा करण्यात आला. प्रचंड पोलीस बंदोबस्तात स्थानिक आणि शिवप्रेमी या सोहळ्याला हजर राहिले. उत्सवाचा समारोप करून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गड सोडला तर इतर अधिकारी जवळपासच्या ढाब्यांवर जेवण्यासाठी गेले. गडावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मिलिंद एकबोटे यांच्यासह आठ जणांना जिल्हाबंदी करण्यात आली होती. पूर्वीही त्यांनी असे /आदेश मोडल्यामुळे यंदा कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला होता. गडावर जाणाऱ्या रस्त्यांची नाकेबंदी केली होती. गडाभोवतीच्या जंगलातही बंदोबस्त ठेवण्यात आला होता. असे असताना एकबोटे तेथे येण्याचे धाडस करणार नाहीत, असे प्रशासनाला वाटल्याने वरिष्ठ अधिकारी गेल्यावर गडाचा वेढा ढिला पडला.दुपारी बाराच्या दरम्यान प्रतापगड उत्सव समितीचे अनेक कार्यकर्ते गडावर पोहोचले होते. यात मिलिंद एकबोटे यांचे बंधू नंदकुमार यांचाही समावेश होता. तसेच उत्सव समितीचे अध्यक्ष संजय भोसले हेही वाईहूनआले होते. मिलिंद एकबोटे यांनी वेशांतर केले होते. रंगीत टी-शर्ट, जीन्स, टोपी, गॉगल, स्पोर्ट्स शूज अशा पोशाखात ते एका मोटारसायकलवरून एकेक नाकाबंदी पार करीत गडावर पोहोचले. त्यांनी भवानीमातेचे दर्शन घेतले आणि शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी जात असताना एका हवालदाराला संशय आला. ओळख पटताच हवालदाराने एकबोटे यांना थांबविले आणि खात्री पटताच पोलिसांनी त्यांना गराडा घातला. त्याच वेळी शिवभक्तांनी घोषणा द्यायला सुरुवात केली. एकबोटे यांनी सहकार्याचे आवाहन करताच कार्यकर्ते शांत झाले. पोलिसांच्या वेढ्यातच एकबोटे यांना गडावरून खाली आणण्यात आले आणि पोलीस वाहनातून महाबळेश्वर येथे आणण्यात आले. तेथे गाडी बदलण्यात आली. पोलीस त्यांना कोठे नेत आहेत, हे कोणाला कळू नये म्हणून नाकाबंदी करण्यात आली. (प्रतिनिधी)पत्रकारांना रोखले पोलीस उपअधीक्षक संजय पखाले यांच्या मार्गदर्शनाखाली जीपमधून एकबोटे यांना साताऱ्याकडे नेले जात असताना पत्रकार मोटारसायकलवरून जीपच्या मागे गेले. पत्रकार जवळ पोहोचल्याचे समजताच पखाले खाली उतरले आणि गाडी पुढे गेली. पखाले यांनी पत्रकारांच्या दुचाकीच्या चाव्या ताब्यात घेतल्या. पंधरा मिनिटांनी पत्रकारांना गाड्या परत करून ते महाबळेश्वरला परतले. एकबोटे यांना सायंकाळच्या सुमारास पोलिसांनी पुणे जिल्ह्याच्या हद्दीत सोडले.