शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बाळासाहेबांची सेना सत्तेवरून पायउतार होऊ न देण्याची खेळी

By admin | Updated: January 29, 2017 00:49 IST

कोणत्याही परिस्थितीत मुंबईत भाजपाचा महापौर बसवू द्यायचा नाही, याकरिता शिवसेना-मनसेच्या नेत्यांमध्ये सुरू झालेल्या वाटाघाटी अचानक ‘मातोश्री’कडून थांबवण्यात आल्या आहेत.

- संदीप प्रधान, मुंबई

कोणत्याही परिस्थितीत मुंबईत भाजपाचा महापौर बसवू द्यायचा नाही, याकरिता शिवसेना-मनसेच्या नेत्यांमध्ये सुरू झालेल्या वाटाघाटी अचानक ‘मातोश्री’कडून थांबवण्यात आल्या आहेत. भाजपाला स्वबळावर चित करण्यात मनसेला वाटेकरी करून घेण्यास शिवसेनेतील काहींनी विरोध केला. मात्र, तरीही मनसेच्या केवळ जिंकून येऊ शकतील, अशाच जागांवर उमेदवार उभे करून शिवसेनेला अपशकुन न करण्याचा निर्णय मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून घेतला जाण्याची शक्यता आहे.भाजपासोबतची युती महापालिका निवडणुकीत तुटणार, हे दिसू लागल्यावर शिवसेनेतील काही मंडळींनी पुढाकार घेऊन मनसेसोबत समझोता करण्याची सूचना उद्धव ठाकरे यांना केली. त्यांच्याच सूचनेवरून वाटाघाटी सुरू झाल्या. मनसे मुंबईत शिवसेनेला मदत करील आणि शिवसेना नाशिकमध्ये मनसेला हात देईल, असा प्रस्ताव पुढे आला. मात्र, चर्चेचे घोडे दादर-माहिम येथे येऊन अडले. लोकसभा व विधानसभा निवडणुकांत दादर-माहिमचा गड शिवसेनेने काबीज केला असला, तरी मागील महापालिका निवडणुकीत या परिसरात मनसेचे सात नगरसेवक विजयी झाले होते. मात्र, येथेच वाटाघाटी बिनसल्या. त्यानंतर, मातोश्री पुन्हा ‘नॉट रिचेबल’ झाली. मागील विधानसभा निवडणुकीच्या वेळी भाजपाने अचानक युती तोडल्यावर उद्धव-राज हे दूरध्वनीवर बोलले होते. त्यानंतर, दोन्ही बाजूंकडील नेत्यांमध्ये जागा वाटपाची चर्चा झाली होती. मात्र, अचानक ‘मातोश्री’च्या निकटवर्तीयांनी त्यामध्ये बिब्बा घातला. मनसे आपल्या उमेदवारांना ‘ए’ व ‘बी’ फॉर्म वाटायची थांबली असताना, तिकडे शिवसेनेने आपल्या उमेदवारांना फॉर्म वाटून टाकले. या वेळी पुन्हा त्याचीच पुनरावृत्ती झाली आहे.मात्र, आता राज यांनी आपल्या केवळ जिंकू शकतील, अशाच जागांवर उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते. कोणत्याही परिस्थितीत मुंबईत भाजपाचा महापौर बसू नये आणि दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना सत्तेवरून पायउतार होऊ नये, याकरिता आपण हा निर्णय घेत असल्याची घोषणा राज करण्याची शक्यता आहे. या भूमिकेमुळे राज यांच्याबद्दल शिवसैनिकांत आस्था, प्रेम निर्माण होईल, अशी मनसेला खात्री वाटते.शिवसेनेतून विरोध का?गेली २५ वर्षे ज्याला मित्र म्हटले, तो भाजपा गिळायला सिद्ध झाला असताना, ज्या मनसेने २००६ पासून डोकेदुखी दिली, तो पक्ष जागा वाटपाचा समझोता करून पुन्हा जिवंत करायचा कशाला, असा एक प्रबळ मतप्रवाह शिवसेनेत असून, हे मत असणारी मंडळी उद्धव यांची अत्यंत निकटवर्तीय आहेत. स्वबळावर लढून भाजपाला पराभूत करणे शक्य असताना, त्या यशात वाटेकरी कशाला घ्यावा, असे शिवसेनेतील मनसे विरोधकांचे मत आहे.