ऑनलाइन लोकमत
संजय दत्तला आपल्याला सोडवायचे आहे असे सांगत बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्याला दरडावले, तर त्यास नकार देताच मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी माझ्याकडून बाँबस्फोटाचा खटला काढून घेतला, मात्र तत्कालिन गृहमंत्री गोपीनाथ मुंडे यांनी आपल्याला तारले आणि आज जो काही मी आहे तो त्यांच्यामुळेच अशी श्रद्धांजली विशेष सरकारी वकिल उज्ज्वल निकम यांनी मुंडेंना वाहिली आहे.
या खटल्यातील आरोपी संजय दत्त याला आपल्याला सोडवायचे आहे, असे बाळासाहेबांनी अधिकाराने आपल्याला सांगितले व मुख्यमंत्र्यांना माझे वकिलपत्र काढण्याचा व पुन्हा जळगावला धाडण्याचा आदेश दिला असे सांगणा-या उज्ज्वल निकम यांनी अर्थात, त्यानंतर बाळासाहेबांनी कधी हस्तक्षेप केला नाही, उलट माझं कौतुक केलं व आमची गट्टी जमली अशी आठवणही सांगितली आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या पहिल्या स्मृतीदिनानिमित्त (३ जून) पुण्यातील चपराक या साप्ताहिकास दिलेल्या मुलाखतीत निकम यांनी संजय दत्तला वाचवण्यासाठी बाळासाहेबांनी कसा दबाव टाकला, परंतु मुंडे यांनी बाळासाहेबांची समजूत काढली, खटला माझ्याकडून काढून घेतला नाही आणि पुन्हा जळगावला न धाडता, मुंबईतच ठेवून आपल्याला तारले, असे सांगत, आपल्या यशस्वी कारकिर्दीचे श्रेय मुंडे यांना दिले आहे.
संपूर्ण मुलाखत www.chaprak.com येथे वाचण्यास उपलब्ध आहे.