शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

‘समतोल’ बेघर मुलांना मुख्य प्रवाहात आणण्याचा...

By admin | Updated: January 29, 2017 00:41 IST

मुंबईतील रेल्वे स्थानकांवर राज्यभरातून रोज शेकडो बेघर मुले येत असतात. मुंबईचे आकर्षण, घरातील वितुष्ट, सेलिब्रिटीला भेटण्याची ओढ अशी बरीच कारणे यामागे असतात.

- प्रवीण दाभोळकर मुंबईतील रेल्वे स्थानकांवर राज्यभरातून रोज शेकडो बेघर मुले येत असतात. मुंबईचे आकर्षण, घरातील वितुष्ट, सेलिब्रिटीला भेटण्याची ओढ अशी बरीच कारणे यामागे असतात. अशा वेळी त्यांना आईवडिलांच्या छत्रछायेत पाठवणे खूप जिकिरीचे काम असते. आपले घरदार सांभाळत, संपूर्ण आयुष्य अशा मुलांसाठी अर्पण करणे, हे अनोखे कार्य विजय जाधव यांच्यासारखे समाजसेवक ‘समतोल’ संस्थेच्या माध्यमातून केले जात आहे. या माध्यमातून गेल्या बारा वर्षांत ६,४१४ मुलांना स्वगृही पोहोचविण्यात आले आहे, पण आजही शासनातर्फे मिळणाऱ्या प्रोत्साहन, पाठिंब्याची समतोलला जास्त गरज आहे. मुंबईत मिळेल तिथे राहायचे, मिळेल ते खायचे, अशी मानसिकता या मुलांनी आधीच तयार केलेली असते. त्यांची मन:स्थिती समजून घेताना, रेल्वे स्टेशनवर भटकणाऱ्या मुलांशी बोलणे, त्यांची मन:स्थिती समजून घेऊन त्यांचा विश्वास संपादन करणे हे खूप कठीण काम असते. घर सुटल्यामुळे सैरभैर झालेली, वाईट संगतीने व्यसनांच्या विळख्यात अडकलेली, कुमार्गाला लागलेली, आपल्याला हवी ती वस्तू नाही मिळाली, तर समोरच्या माणसाच्या जिवाचे बरेवाईट करायलाही मागेपुढे न बघणारी ती साधारण ७ ते १४ वयोगटांतली मुले या मनपरिवर्तन केंद्रात असतात. त्यांना मनपरिवर्तन केंद्रात दाखल करण्यापूर्वी पोलिसात त्यांची रीतसर नोंद केली जाते. दिवसभर भटकणे, कचरा वेचणे, व्यसन करणे, भीक मागणे, चोरी-लबाडी करणे अशा बेशिस्त दैनंदिन जीवनातून त्यांच्या आयुष्याला शिस्त लागण्यासाठी थोडा वेळ द्यावाच लागतो, हळूहळू ही मुले या वातावरणात रमून जातात. नियमित व्यायाम, प्रार्थना, मनोरंजनात्मक खेळ यांच्या माध्यमातून मुलांवर संस्कार केले जातात. समाजातील प्रतिष्ठित, विविध हुद्द्यांवर काम करणारी माणसे इथे भेटी देत आपले अनुभव सांगतात. या सर्वांचा मुलांवर सकारात्मक परिणाम होत असतो. दुसऱ्या बाजूला मुलांना पालकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरू असतो. देशाचे भविष्य असलेली, पण आयुष्याचा रस्ता चुकलेले ही मुले समतोलच्या माध्यमातून पुन्हा मुख्य प्रवाहात सामील होतात. कल्याणपासून जवळ असणाऱ्या मामणोली इथे, हिंदू सेवा समितीच्या आवारात वर्षातून तीन वेळा ४५ दिवस हे शिबिर सुरू असते. समतोल अ‍ॅप : ‘समतोल मित्र’ या अ‍ॅपच्या माध्यमातून मुलांचे फोटो आणि माहिती नागरिक समतोलपर्यंत पोहोचवू शकतात. संस्थेचे कार्यकर्ते वस्तुस्थितीची शहानिशा करून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकतील. ‘समतोल मित्र बना’ व समतोलच्या निगरानी पथकात दाखल होण्याचे आवाहन संस्थेतर्फे केले जात आहे. भुसावळ, संभाजीनगर, अकोला, पुणे, मुंबईतील सहा स्थानकांवर कार्यकर्ते समतोल कामांबाबत माहिती देत, स्थानिक लोकांना आवाहन करीत आहेत. स्वावलंबनाकडे... : स्वयंरोजगाराच्या माध्यमातून इथल्या प्रत्येक मुलाला स्वावलंबी बनवण्याचा संस्थेचा हेतू आहे. साधारण १५ वर्षे वयोगटांतील मुले इथे असतात. शिक्षण कमी असल्याने, त्यांना रोजगार मिळणे कठीण असते. अशा वेळी त्यांना स्किल ट्रेनिंग देणे गरजेचे असते. समतोलच्या वास्तूत प्लंबर, इलेक्ट्रिशियन, टर्नर-फिटर, संगणक, शेती व्यवसाय असे प्रशिक्षण या मुलांना देण्याचा मानस विजय जाधव यांनी व्यक्त केला. एम. एस. डब्ल्यू.चे प्रशिक्षण घेणारे विद्यार्थी आपले घरदार सोडून मनपरिवर्तन केंद्रात अहोरात्र मेहनत घेत असतात. २००४-०५ समतोलच काम सुरू झाले. २००७ पासून आतापर्यंत ७,८६० मुलांना स्वगृही पोहोचविण्याचे काम संस्थेने केले आहे. देशाचे भविष्य असलेल्या या मुलांसाठी अर्थसंकल्पात तरतूद नसणे ही गंभीर बाब आहे. यासाठी विशिष्ट निधी असेल, तात्पुरता निवारा, पुनर्वसन सुरळीत होऊ शकेल. महाराष्ट्रात या प्रकारची कोणतीच योजना सुरू नाही. - विजय जाधव,अध्यक्ष, समतोल