शहरं
Join us  
Trending Stories
1
"गोपीनाथ मुंडेंनी मराठा आरक्षणाला विरोध केला नाही, पण..."; पंकजा मुंडे दसरा मेळाव्यात स्पष्टच बोलल्या
2
'आग तो लगी थी घर में...."; धनंजय मुंडेंनी शायरीतून भावना व्यक्त केली, मंत्रिपदाबाबत खंतही बोलून दाखवली
3
कराड आमचे दैवत...; पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यात झळकले वाल्मिक कराडचे पोस्टर
4
सोन्या-चांदीच्या दरात विक्रमी वाढ; गुंतवणूकदारांनी मात्र टाळाव्यात 'या' ५ चुका
5
Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराहचा मोठा पराक्रम, घरच्या मैदानावर 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
७५ वर्षांचा नवरा अन् ३५ वर्षांची नवरी! लग्नाच्या रात्रीच पतीचा मृत्यू; गूढ उलगडलं, समोर आलं सत्य
7
१९ वर्षे शनि, १८ वर्षे राहु महादशा: शनि महादशेत राहु अंतर्दशा आली? भाग्योदय; अपार पैसा-लाभ!
8
अभिनेता विजयला सोबत घेण्याचा भाजपाचा प्रयत्न; चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर समोर आली नवीन रणनीती
9
भारत गाझामध्ये सैन्य पाठवणार? संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैनिकांची परिषद बोलावली, चीन आणि पाकिस्तानला बोलावले नाही
10
Gensol Engineering Ltd: ₹२४०० वरुन ₹४१ वर आला 'हा' शेअर, आता ट्रेडिंग झालं बंद; संकटात कंपनी, तुमच्याकडे आहे का शेअर?
11
WhatsApp वापरकर्त्यांची प्रतीक्षा संपली! फक्त नंबर डायल करा आणि कॉल करा, नवीन फिचर आले
12
डोक्याला ताप! दिवसभर इन्स्टाग्रामवर रील बनवायची बायको; नवरा ओरडल्यावर मुलासह गायब
13
शुक्रवारपासून पंचक प्रारंभ: ५ दिवस अत्यंत प्रतिकूल, अशुभ; ‘या’ गोष्टी करूच नयेत, अमंगल काळ!
14
TATA Motors च्या गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी; डीमर्जरची तारीख आली समोर, एकावर १ शेअर मिळणार
15
अश्विन पाशांकुशा एकादशी २०२५: श्रीविष्णूंचे पद्मनाभ स्वरुप पूजन, ‘असे’ करा व्रत; शुभ-लाभ!
16
"बेबी, स्वीटी, तू माझ्यासोबत...!" विद्यार्थीनीसोबत एवढ्या घाणेरड्या गप्पा, समोर आलं चैतन्यानंदचं घृणास्पद चॅट
17
IMD: बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ धडकणार; ओडिशा किनारपट्टीला धोका!
18
काय आहे 'सर क्रिक' वाद? ज्यावरून भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची पाकिस्तानला थेट धमकी
19
IND vs WI : जादूगर आला अन् जादू दाखवून गेला! काही कळायच्या आत कुलदीपनं कॅरेबियन बॅटरचा खेळ केला खल्लास (VIDEO)
20
हायप्रोफाईल चोर! विमानानं दिल्लीला जायचे अन् कार चोरायचे; ५ आलिशान कारसह ८३ लाखांचा माल जप्त

बालभारतीची पुस्तके जगाशी ‘बोलणार’

By admin | Updated: March 13, 2017 04:10 IST

क्यूआर कोड वापरून ‘बोलकी’ झालेली बालभारतीची पुस्तके आता अवघ्या जगासोबत संवाद साधणार आहेत. कॅनडामध्ये होऊ घातलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत महाराष्ट्रातील ‘बोलक्या’ पुस्तकांना

अविनाश साबापुरे, यवतमाळक्यूआर कोड वापरून ‘बोलकी’ झालेली बालभारतीची पुस्तके आता अवघ्या जगासोबत संवाद साधणार आहेत. कॅनडामध्ये होऊ घातलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत महाराष्ट्रातील ‘बोलक्या’ पुस्तकांना मानाचे निमंत्रण मिळाले आहे. अध्ययन अक्षम असलेल्या कोणत्याही देशातील विद्यार्थ्यांसाठी ही पुस्तके वापरता येतील का, याचा अदमास परिषदेत घेतला जाणार आहे. चालू शैक्षणिक सत्रात इयत्ता सहावीची नवी पाठ्यपुस्तके तयार करताना बालभारतीने त्यात क्यूआर कोड वापरला. या पुस्तकांत पानापानावर विशिष्ट टॅग लावण्यात आला आहे. त्यामुळे पुस्तकातील कविता मोबाईलमध्ये ऐकता येते किंवा पुस्तकातील चित्रावर मोबाईल ठेवल्यास त्या चित्राशी संबंधित व्हिडिओ मोबाईलमध्ये बघता येतो. मुलांना पाठ्यपुस्तकांकडे आकृष्ट करणारा हा प्रयोग सोलापूर जिल्ह्यातील रणजितसिंह डिसले या शिक्षकाने सर्वप्रथम आपल्या शाळेत केला. तोच नंतर बालभारतीने स्वीकारून राज्यभरातील सहावीच्या १८ लाख पुस्तकांमध्ये वापरला. आता हाच प्रयोग जगभरातील शिक्षणप्रेमींपुढे ठेवण्यासाठी आमंत्रण आले आहे.शिक्षणात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर कसा करावा, याबाबत मायक्रोसॉफ्टच्या वतीने टोरांटो (कॅनडा) येथे २१ ते २४ मार्च दरम्यान आंतरराष्ट्रीय परिषद होत आहे. त्यात विविध देशातील ३०० तंत्रस्नेही शिक्षणतज्ज्ञ सहभागी होणार आहेत.भारतातील एकंदर आठ जणांना आपले शिक्षणविषयक प्रयोग सादर करण्याची यात संधी मिळणार आहे. दिल्ली, चेन्नई, पंजाबमधील ५ शिक्षिकांचा समावेश आहे. हे सर्व खासगी नामवंत शाळांमधील अध्यापक आहेत. एकमेव महाराष्ट्रातील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक म्हणून रणजितसिंह डिसले यांना मायक्रोसॉफ्टचे निमंत्रण आहे. पुस्तके ‘बोलकी’ केल्यावर ग्रामीण भागात राहणारे आणि विविध कारणांनी अध्ययनात मागे असणारे विद्यार्थीही गतीने अभ्यास करतात, हा प्रयोग ते जगापुढे ठेवणार आहेत.