शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

बेळगावच्या मेजरने केली मृत्यूवर मात

By admin | Updated: January 28, 2017 01:23 IST

हिमस्खलन : कुलपाने बर्फ फोडून तीन तासांनी बाहेर

बेळगाव : जम्मू-काश्मीर येथे झालेल्या हिमस्खलनात बर्फाखाली अडकलेल्या येळ्ळूर (जि. बेळगाव ) येथील मेजर श्रीहरी कुगजी यांनी साक्षात मृत्यूला हरविले. बर्फामळे छावणीचे छप्पर कोसळल्याने ते गाडले होते. त्याही परिस्थितीत कुलुपाने तीन तास बर्फ फोडून त्यांनी स्वत:ची सुटका करुन घेतली. श्रीहरी सोनमर्ग येथे सेवा बजावत आहेत. या भागात मोठ्या प्रमाणात बर्फवृष्ठी सुरु आहे. हिमस्खलन झाल्यावर त्यांच्या छावणीचे छप्पर बर्फाच्या ओझ्याने कोसळल्यामुळे खाली आले. काही कळायच्या आतच श्रीहरी बर्फाखाली गाडले गेले. पंधरा फूट बर्फाखाली अडकल्यामुळे काही क्षण काय करावे हे त्यांना सुचले नाही. पण लगेच त्यांनी हालचाल करण्यास सुरुवात केली. त्यांच्या हाताला ट्रंकचे कुलूप मिळाले. त्यामुळे जमेल तसा ते कुलूपाच्या साह्याने बर्फ फोडू लागले. अखेर बोट बाहेर पडण्याइतकी जागा त्यांनी तयार केली. बोटे बर्फाबाहेर काढून हलवत असताना बचाव आणि शोधकार्यासाठी आलेल्या पथकाला त्यांची बोटे दिसली आणि त्यांना बाहेर काढण्यात आले. श्रीहरी मृत्यूच्या जबड्यातून बाहेर आल्याची माहिती मिळताच त्यांच्या आई-वडिलांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. श्रीहरी महार रेजिमेंटमध्ये मेजर आहेत. सहा महिन्यांपूर्वी ते बेळगावात सेवा बजावत होते.सध्या त्यांची नेमणूक रेजिमेंट सोनमर्ग येथे असल्याने ते जम्मू-काश्मीरमध्ये सेवा बजावत आहेत. निवृत्त मेजर सुभेदार अनंत कुगजी यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, श्रीहरी सुखरूप असल्याचा फोन आल्यावर आनंद झाला असला तरी इतर जवान शहीद झाल्याचे दु:ख आहे. (प्रतिनिधी)सैनिकी परंपरायेळ्ळूर गावचे श्रीहरी कुगजी यांचे वडील देखील १ मराठामध्ये सुबेदार मेजर म्हणून निवृत्त झाले आहेत. बहीण पंकजादेखील एनडीए करून सध्या जैसलमेरमध्ये इ.एम.ई.मध्ये सेवा बजावत आहेत. श्रीहरी यांची पत्नी मुंबईत वास्तव्यास असून, त्यांना अत्रेय हा चार वर्षाचा मुलगा आहे.