शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

बच्चू कडू नाराज, 'शिंदेंनी शब्द दिलेला, बनवायला हवे होते'; मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने एकनाथ शिंदेंची घेतली भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2022 11:41 IST

Bacchu Kadu on Cabinet Expansion: बच्चू कडू यांनी आज सकाळीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नंदनवन निवासस्थानी भेट घेतली. यावेळी त्यांनी शिंदे समर्थक अपक्ष आमदारांना विस्तारात स्थान न दिल्याबाबत चर्चा केली.

एकनाथ शिंदे यांच्या पहिल्या मंत्रिमंडळाचा विस्तार मंगळवारी करण्यात आला. परंतू यामध्ये अपक्ष आमदारांना स्थान देण्यात आले नाही. सारी कॅबिनेट मंत्रिपदे ही शिवसेना आणि भाजपामध्ये वाटण्यात आली. यामुळे प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू नाराज झाले आहेत. आज त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर आपली उघड नाराजी व्यक्त केली. 

मंत्रिमंडळात स्थान मिळाल्याने नाराज आहात का? असा प्रश्न बच्चू कडू यांना विचारण्यात आला. यावर त्यांनी नाराजी आहे, पण एवढीही नाही की दुसरीकडे जाऊ. ही क्षणीक नाराजी आहे. सर्वच मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असता तर वेगळी गोष्ट असती. काही मुद्द्यांना घेऊन आम्ही शिदेंना पाठिंबा दिला होता. त्यांनी काही सांगितलेले म्हणून आम्ही मागितले. शिंदेंनी मंत्रिपद देण्याचे आम्हाला आश्वासन दिले होते. मंत्री बनवितो म्हणालेले, तर बनवायला हवे होते. परंतू पहिल्या विस्तारात मिळाले नाही. पहिल्या नाही निदान शेवटच्या तरी देतील. नाही दिले तर विचार करू, अशा शब्दांत बच्चू कडू यांनी नाराजी व्यक्त केली. 

हे राजकारण आहे. यात दोन आणि दोन चार होत नाही, शून्यही होऊ शकतो. अडीच वर्षांनीदेखील मंत्रिमडळ विस्तार होऊ शकतो. काहीही सांगू शकत नाही, असे कडू म्हणाले. बच्चू कडू यांनी आज सकाळीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नंदनवन निवासस्थानी भेट घेतली. यावेळी त्यांनी शिंदे समर्थक अपक्ष आमदारांना विस्तारात स्थान न दिल्याबाबत चर्चा केली. यावर सप्टेंबरमध्ये मंत्रिमंडळ विस्तार होईल तेव्हा प्रहारला मंत्रिपद दिले जाईल, असे आश्वासन शिंदे यांनी दिल्याचे समजते. “फार महत्त्वाचे निर्णय केले पाहिजे त्यासाठी आम्ही आग्रही राहू. मंत्रीपदाचा विषय तो आमचा हक्का आणि तो आम्ही मिळवणारच. त्याबद्दल शंका नाही. ते आम्हाला मिळणारही आहे,” असे बच्चू कडू मंत्रिमंडळ विस्तारापूर्वीच्या बैठकीला जाताना म्हणाले होते.

शिंदे सरकारमध्ये सामाजिक न्याय, अपंग कल्याण आणि अमरावतीचं पालकमंत्रीपद मिळायला हवं, अशी मागणी बच्चू कडू यांनी केली होती.

टॅग्स :Bacchu Kaduबच्चू कडूEknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाCabinet expansionमंत्रिमंडळ विस्तार