शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

भररस्त्यात दिला बाळाला जन्म

By admin | Updated: February 12, 2017 02:26 IST

विक्रोळीतील एका कामगार महिलेच्या प्रसूती वेदना वाढल्याने जवळच असलेल्या प्रसूतीगृहाकडे धाव घेतली. मात्र ते बंद असल्याने दुसऱ्या रुग्णालयाची वाट शोधत असताना

मुंबई : विक्रोळीतील एका कामगार महिलेच्या प्रसूती वेदना वाढल्याने जवळच असलेल्या प्रसूतीगृहाकडे धाव घेतली. मात्र ते बंद असल्याने दुसऱ्या रुग्णालयाची वाट शोधत असताना असह्य वेदनांनी अश्रू अनावर होऊन तिला रस्त्यातच बसावे लागण्याची धक्कादायक घटना विक्रोळीत शनिवारी घडली. त्याचदरम्यान तेथून जाणाऱ्या प्रचारफेरीतील महिला कार्यकर्त्यांनी प्रचार थांबवून या महिलेकडे धाव घेतली आणि महिलेची प्रसूती करून माणुसकीचे अनोखे दर्शन घडविले. विक्रोळीसारखा गजबजलेला परिसर. वेळ दुपारी साडेबाराची. विक्रोळी टागोर नगर परिसरात राजकीय पक्षाची प्रचार रॅली सुरू होती. प्रचाराच्या घोषणाबाजीत एका कार्यकर्ता महिलेच्या कानावर रस्त्याच्या बाजूने रडण्याचा आवाज आला. तिच्याकडे धाव घेताच प्रसूतीकळांमुळे या महिलेने रस्त्यात बसल्याचे सांगितले. तसेच बाळ अर्धे बाहेर आले असल्याचे तिने सांगितले.’ ही विचारपूस झाल्यानंतर प्रचारफेरीतील कार्यकर्त्या मधुरा जोशी, श्रद्धा रुके, वासंती शिंदे यांनी प्रचार बाजूला सोडून तिच्याभोवती साडीच्या पदराने आडोसा तयार केला आणि प्राथमिक उपचार सुरू केले. त्यानंतर तत्काळ १०८ रुग्णवाहिका बोलावून घेतली. रुग्णवाहिका तेथे दाखल होताच तेथील डॉक्टरांच्या मदतीने भररस्त्यात या महिलेची सुखरूप प्रसूती करण्यात आली आणि बाळाला व आईला रुग्णवाहिकेने राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले. (प्रतिनिधी)वेदनांमुळे रस्त्यातच बसावे लागलेप्रसूती झालेल्या महिलेचे नाव आशा पवार असे असून, ती टागोरनगर परिसरात राहते. याच परिसरातील इमारतींमध्ये ती सफाई कामगार म्हणून काम करते. कामादरम्यान वेदना वाढल्याने तिने पालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रसूतीगृहाकडे धाव घेतली.मात्र पालिकेचे हे रुग्णालय बंद असल्यामुळे तिला रस्त्यातच बसावे लागले. वेदनांमुळे जवळचे अन्य पालिका रुग्णालय तिच्या नजरेत पडले नाही.