शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

बाबा सिद्दिकी यांच्या घरावर छापा

By admin | Updated: June 1, 2017 04:13 IST

वांद्रे येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील ४०० कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बुधवारी काँगे्रस नेते

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : वांद्रे येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील ४०० कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बुधवारी काँगे्रस नेते आणि वांद्रे पश्चिम मतदारसंघाचे माजी आमदार बाबा सिद्दिकी यांच्या वांद्रे येथील घर-कार्यालयासह सात ठिकाणी छापे टाकले. ईडीने सिद्दिकी यांच्यावर मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत महत्त्वपूर्ण कागदपत्रे ईडीच्या हाती लागली असून, त्यानुसार पुढील तपास सुरू आहे. वांद्रे येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत (झोपु योजना) फसवणूक झालेल्या तक्रारदाराने २०१२ मध्ये न्यायालयात धाव घेतली होती. या योजनेअंतर्गत झोपड्या पाडल्यानंतर निवासी इमारतींचे बांधकाम करण्यात आले. बनावट कागदपत्रे बनवून येथील व्यवहार करत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप बाबा सिद्दिकी आणि त्यांचा सहकारी बिल्डर रफीक कुरेशी यांच्यावर आहे. यामध्ये जवळपास ४०० कोटींचा घोटाळा झाल्याचे समोर आले. न्यायालयाच्या आदेशाने २०१४ मध्ये वांद्रे पोलीस ठाण्यात या घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. या आधारावर ईडीने २०१७ मध्ये सिद्दिकी यांच्यासह नऊ जणांवर मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. या घोटाळ्यामागे आणखी काही बेनामी कंपन्यांची साखळी असल्याचा संशय ईडीला आहे. त्यामुळे अधिक पुरावे गोळा करण्यासाठी एकाच वेळी हे छापे टाकण्यात आल्याची माहिती ईडी अधिकाऱ्यांनी दिली. सिद्दिकी यांच्या वांद्रे येथील घर, कार्यालयासह सात ठिकाणी छापे टाकण्यात आले. या कारवाईतून महत्त्वपूर्ण कादगदपत्रे, काही व्यवहारांची माहिती ईडीच्या हाती लागली. या माहितीच्या आधारावर पुढील कारवाई करण्यात येईल, असे ईडीकडून सांगण्यात आले. बॉलीवूडमध्ये दबदबा असलेला नेताबाबा सिद्दिकी वांद्रे पश्चिम मतदारसंघातून तीनवेळा निवडून आले होते. २००२-०४ या काळात ते म्हाडाचे मुंबई मंडळाचे अध्यक्ष होते. त्यांच्या इफ्तार पार्टीला विविध क्षेत्रांतील दिग्गजांची उपस्थिती असते. त्यांचे बॉलीवूडमध्येही अनेक कलाकारांशी चांगले संबंध आहेत.सलमान खान आणि शाहरूख खान हे सिद्दिकींच्या पार्टीला आवर्जून हजेरी लावत. ईडीच्या कारवाईबाबत विचारणा करण्यासाठी बाबा सिद्दिकी यांना दूरध्वनी केला असता संपर्क होऊ शकला नाही. एसएमएसलाही त्यांनी उत्तर दिले नाही.