शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

बी आणि सी वॉर्ड - प्रभाग सरकले...इच्छुकांमध्ये रस्सीखेच

By admin | Updated: January 30, 2017 21:46 IST

फेररचनेमुळे शहराला मोठा धक्का बसला. यात बी आणि सी प्रभागच हलला आहे

मुंबई: फेररचनेमुळे शहराला मोठा धक्का बसला. यात बी आणि सी प्रभागच हलला आहे. ए वॉर्डमधील दोन प्रभाग बी वॉर्डमध्ये सरकले असून सीमध्येही हीच अवस्था आहे. शहरातून एक सात प्रभाग गायब झाले आहेत. याचा धक्का ए, बी आणि सी वॉर्डला समान बसला आहे. यामुळे या प्रभागांमध्ये इच्छुकांमध्ये जोरदार रस्सीखेच आहे. मेट्रोच्या मुद्दावर आक्रमक राहिल्याने येथील मराठीबहुल भागातून शिवसेनेला फायदा मिळू शकेल. मात्र इच्छुक अधिक असल्याने बंडखोरीचा सामना करावा लागणार आहे.शहर भागामधील लोकसंख्या गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात उपनगरामध्ये स्थलांतरीत झाली आहे. यामुळे बी वॉर्डमध्ये ५४ हजार आणि सी वॉर्डमध्ये ५७ हजार लोकसंख्या उरली आहे. लोकसंख्येत घट झाल्यामुळे बी आणि सी वॉर्डमधून प्रत्येकी एक प्रभाग कमी करण्यात आला आहे. त्यामुळे बी वॉर्डमध्ये आता दोनच नगरसेवक उरले आहेत. तर सी वॉर्डमध्ये तीन प्रभाग उरले आहेत. फेररचनेमुळे प्रभागांच्या सीमाही सरकल्यामुळे येथील नगरसेवकांसमोरील अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे आपली राजकीय कारर्कीद वाचविण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांच्या इच्छुकांना येथे पायपीट करावी लागणार आहे.बी वॉर्डमध्ये काँग्रेसचे ज्ञानराज निकम आणि वकारुन्नीसा अन्सारी यांचे प्रभाग सी वॉर्डमध्ये सरकले आहेत. तर शिवसेनेचे गणेश सानप आणि काँगे्रसचे जावेद जुनेजा यांच्या प्रभागाचा काही भाग बी वॉर्डमध्ये आला आहे. तर सी वॉर्डमध्ये एक प्रभाग उडाला आहे. बेकायदा बांधकामं व फेरिवाल्यांचा विळखा असलेल्या बी वॉर्डमध्ये नागरी सुविधांचाही अभाव आहे. मात्र या वॉर्डमध्ये काँग्रेसचे वर्चस्व असल्याने शिवसेनेला या ठिकाणी तगडा उमेदवार द्यावा लागणार आहे. ...................................................................वॉर्ड सी प्रभाग क्रमांक : २२०खुलालोकसंख्या : ५४४१८अनुसूचित जाती : ८५९अनुसूचित जमाती : ९३कामाठीपुरा, नळबाजार, गुलालवाडी प्रभाग क्रमांक : २२१खुलालोकसंख्या : ५७१४१अनुसूचित जाती : २५०अनुसूचित जमाती : ८७विठ्ठलवाडी, झवेरी बाजार, फणसवाडी, भुलेश्वर, लोहार चाळ, प्रभाग क्रमांक : २२२इतर मागासवर्ग (महिला)लोकसंख्या : ५४६०२अनुसूचित जाती : ११९९अनुसूचित जमाती : १९८धोबी तलाव, सोनापूर, चंदनवाडी, जिमखाना, ठाकूरद्वार, चेऊलवाडी ................................................................... वॉर्ड बी प्रभाग क्रमांक : २२३खुला (महिला)लोकसंख्या : ३०४५अनुसूचित जाती : ४७८०अनुसूचित जमाती : ७५९उमरखाडी, दानाबंदर, प्रिन्सेस डॉक, वाडीबंदरप्रभाग क्रमांक : २२४इतर मागासवर्ग (महिला)लोकसंख्या : ६४२४५अनुसूचित जाती : ५५८अनुसूचित जमाती : ३३० व्हिक्टोरिया डाक्स, बेंगालीपूरा, कोळीवाडा, मांडवी, पायधूनी..................................................................महापालिका २०१२ च्या निवडणुकीप्रमाणे विजयी उमेदवार प्रभाग २१७विजयी उमेदवार : युगंधरा साळेकर - ५९६४पराभूत उमेदवार : प्रीती कुडाळे - ४८०९ प्रभाग २१८ विजयी उमेदवार : संपत ठाकूर - ६७०१ पराभूत उमेदवार : राकेश काळे - ३४९०प्रभाग २१९ विजयी उमेदवार : वीणा जैन पराभवी उमेदवार : स्वीटी संघवी प्रभाग २२० विजयी उमेदवार : याकूब मेमन - ६४७५पराभूत उमेदवार : नदीन सलीम चोहान - ६३३३प्रभाग २२१विजयी उमेदवार : ज्ञानेश्वर निकम - ७४८९पराभूत उमेदवार : अमित साखरकर - ५३७६प्रभाग २२२विजयी उमेदवार : वकारउनीसा अन्सारी : ५१६६पराभूत उमेदवार : सईदा मर्चंट : २६००प्रभाग २२३विजयी उमेदवार : जावेद जुनेजा - ४८८४पराभूत उमेदवार : शोभन परवीन - ३२७२ प्रभाग २२४विजयी उमेदवार : गणेश सानप - ५८७०पराभूत उमेदवार : शिवकुमार साहू - ४३९९...................................................................