शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची मोठी घोषणा...! 'या' देशांना दिली जाणार टॅरिफ सूट, नवा कार्यकारी आदेश जारी
2
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानात बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
3
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
4
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
5
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
6
...अन् हिटमॅन रोहित शर्मानं चाहत्यांना हात जोडून केली विनंती; नेमकं काय घडलं? व्हिडिओ व्हायरल
7
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
8
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
9
भाईंदरमध्ये गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याचा शॉक लागून मृत्यू 
10
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
11
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
12
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
13
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
14
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
15
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
16
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
17
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
18
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
19
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
20
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल

पाश्चात्त्य जगतात आयुर्वेद....

By admin | Updated: July 19, 2015 01:20 IST

जर्मनीसारख्या प्रगत देशात आयुर्वेदाचे पंचतारांकित पंचकर्म केंद्र्र बॅडअ‍ेम्स येथे नदीकिनारी कार्यरत आहे. अमेरिकेत लँकेस्टर येथे सुमारे दोनशे एकरच्या व्हिलामध्ये पंचक र्म उपचार दिले जातात.

आयुर्वेद हे भारतीय वैद्यकशास्त्र आज जगभर झपाट्याने प्रसार पावत आहे. आयुर्वेदातील स्वस्थ व्यक्तीचे स्वास्थ्य टिकवून ठेवणारी प्रतिबंधात्मक तत्त्वप्रणाली, दीनचर्या, रात्रीचर्या, ऋतुचर्या, आहार-विहार यांचे मार्गदर्शन शुद्ध स्वरूपातील निर्धोक वनौषधी चिकित्सा, पंचकर्म उपचार पद्धतीसारखी प्रभावी आणि तत्काळ उपयुक्तठरणारी चिकित्सक यामुळे पाश्चात्त्य देशातील जनता आयुर्वेदाकडे आकर्षित होत आहे.जर्मनीसारख्या प्रगत देशात आयुर्वेदाचे पंचतारांकित पंचकर्म केंद्र्र बॅडअ‍ेम्स येथे नदीकिनारी कार्यरत आहे. अमेरिकेत लँकेस्टर येथे सुमारे दोनशे एकरच्या व्हिलामध्ये पंचक र्म उपचार दिले जातात. ‘अमेरिकन हार्ट असोसिएशन’ने नुकतेच हृदयविकार प्रतिबंधासाठी आयुर्वेदाचे सिद्धान्त संशोधनातून मान्य केले आहेत.१९८०च्या दशकात महर्षी महेश योगी यांनी भावातीत ध्यान पद्धतीबरोबरच आयुर्वेदाची पाश्चात्त्य जगताला ओळख करून दिली. आयुर्वेदातील मूलभूत सिद्धान्त विज्ञानाच्या कसोटीवर तावून सुलाखून घेऊन पाश्चात्त्यांच्या धाटणीत ‘महर्षी आयुर्वेद’ या नावाने सादर केला. आज जगातील १४४ देशांत महर्षी आयुर्वेदाची केंद्रे आहेत. शरीरासाठी आयुर्वेद, मनासाठी भावातीत ध्यान अशी तत्काळ लाभदायी पद्धती असल्याने अनेक पाश्चात्त्य डॉक्टर्स महर्षी आयुर्वेदाचे परीक्षण घेऊन गेली २५-३० वर्षे कार्यरत आहेत. डॉ. रॉबर्ट श्नायडर (अमेरिका) डॉ. रॉबर्ट किथ वालेस, डॉ. नॉन्सी लॅन्सडॉर्क, डॉ. स्टुअर्ट स्ट्रासेनबर्ग, डॉ. हरी शर्मा (अमेरिका), डॉ. आॅलिव्हर वर्नर (स्वित्झरर्लंड), डॉ. कारेन पिर्क (जर्मनी), डॉ. वुल्फगॅग (आॅस्ट्रिया), डॉ. वॉल्टर मॉल्क, डॉ. राईन हार्ड पिचा, डॉ. योर गुगलीमीन (इटली) ही काही अघाडीची नावे जी मंडळी आयुर्वेदाचा प्रसार, प्रचार त्यांच्या त्यांच्या देशात करीत आहेत. महर्षी आयुर्वेदावर जगभरातल्या असंख्य विद्यापीठांमधून पद्धतशीर संशोधन सुरू आहे. हजारो वर्षांपूर्वी सांगितलेले सिद्धान्त पाश्चात्त्य डॉक्टर्स नव्याने सिद्ध करून दाखवीत आहेत. हृदयरोगापासून कॅन्सरपर्यंत आणि मनोविकारांपासून ते अस्थिरोगांपर्यंत महर्षी आयुर्वेद गुणकारी ठरतो आहे. महर्षी महेश योगी यांनी तीन दशके युरोपात राहून ध्यान पद्धती आणि महर्षी आयुर्वेदाच्या प्रचार-प्रसार केला आहे. त्याची फळे चाखावयाची असतील तर आयुर्वेद हा पातळ होऊ न देता सवंग न बनविता आयुर्वेदाच्या पदवीधरांनी सामन्यांपर्यंत पोहोचविला पाहिजे.आज जर्मनीसारख्या प्रगत देशात महर्षी आयुर्वेदाचे पंचतरांकित पंचकर्म केंद्र्र बॅडअ‍ेम्स येथे नदीकिनारी कार्यरत आहे. अमेरिकेत लँकेस्टर येथे सुमारे दोनशे एकरच्या व्हिलामध्ये पंचक र्म उपचार दिले जातात, तर फेअरफिल्ड आयोवा येथे ‘महर्षी युनिव्हर्सिटी आॅफ मॅनेजमेंट’ येथे आयुर्वेदाचे प्रशिक्षण दिले जाते. ‘अमेरिकन हार्ट असोसिएशन’ने नुकतेच हृदयविकार प्रतिबंधासाठी महर्षी आयुर्वेदाचे सिद्धान्त संशोधनातून मान्य केले आहेत.आयुर्वेद पदवीधरांना पाश्चात्त्य देशात आयुर्वेद तज्ज्ञ म्हणून काम करण्याची मोठी संधी आहे. वनौषधी विद्यापीठ संस्थेच्या माध्यमातून आम्ही मॉरिशस, मलेशिया, थायलंड, दुबई, सिंगापूर, श्रीलंका, सर्बिया येथे पॅनासिया आंतरराष्ट्रीय परिषद घेतल्या आहेत. कोल्हापूर येथे डिसेंबर २०१४मध्ये जगभरातील ११ देशांचे प्रतिनिधी आयुर्वेद परिषदेसाठी आले होते. रोटमंड-नेदरलँड येथे एप्रिल १५मध्ये पहिली आंतरराष्ट्रीय आयुर्वेद काँग्रेस संपन्न झाली. त्यात ५५ देशांतील ५५० आयुर्वेद डॉक्टर्सनी हजेरी लावली होती. एकंदरीत काय जगभर आयुर्वेदाच्या प्रसाराला मोठा वाव आहे.