शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील मारहाणीच्या घटनेवर अयोध्या पौळ यांची पहिली प्रतिक्रिया, गंभीर आरोप करत म्हणाल्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2023 12:50 IST

Ayodhya Pol: युवा नेत्या आणि शिवसेना ठाकरे गटाच्या सोशल मीडिया समन्वयक अयोध्या पौळ यांना काल रात्री ठाण्यातील कळवा परिसरात एका कार्यक्रमादरम्यान मारहाण कऱण्यात आली. या मारहाणीप्रकऱणी अयोध्या पौळ यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

ठाकरे गटाची भूमिका आक्रमकपणे मांडणाऱ्या युवा नेत्या आणि शिवसेना ठाकरे गटाच्या सोशल मीडिया समन्वयक अयोध्या पौळ यांना काल रात्री ठाण्यातील कळवा परिसरात एका कार्यक्रमादरम्यान मारहाण कऱण्यात आली. या घटनेमुळे ठाण्यातील राजकीय वातावरण पेटले आहे. दरम्यान, या मारहाणीप्रकऱणी अयोध्या पौळ यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. घटनास्थळी काय झालं, पोलिसांनी काय भूमिका घेतली, याबाबत अयोध्या पौळ य़ांनी गंभीर आरोप केले आहेत. 

अयोध्या पौळ यांनी सांगितले की, मनीषा चरडे नावाच्या महिलेने मला ८ जून रोजी व्हॉट्सअॅपवर निमंत्रण पाठवलं होतं. त्यानंतर लगेच त्यांनी मला फोन केला. त्यामध्ये त्यांनी निमंत्रणामध्ये माझा समाजसेविका आणि सौ. असा उल्लेख केला होता. त्यावरून मी त्यांना काही सुधारणा सूचवल्या. मी फोनवर बोलताना त्यांचा परिचय विचारला. तेव्हा त्यांनी मी शिवसेनेची पदाधिकारी आहे, अशी ओळख सांगितली. माझा नंबर तुम्हाला कुणी दिला असं विचारलं असता त्यांनी मला केदार दिघेंचं नाव सांगितलं. मी म्हटलं ठिक आहे. 

दरम्यान, काल मी तिथे गेले असता पोलिसांच्या समोर, पोलीस सर्व काही बघत होते. प्रसारमाध्यमेही तिथे होती. या सर्वांसमोर त्या मला मारत होत्या आणि मी हसत होते. कारण जिथे आपण न्याय मागायला जातो. त्या पोलीस ठाण्यामध्ये एका महिलेला मारहाण होत होती. जे पोलीस ठाणे भारतीय घटनेनुसार चालतं तिथे मला मारहाण होत होती आणि पोलीस हतबलपणे बघत होते, असा आरोप अयोध्या पौळ यांनी केला. जर तुम्ही महामानवांच्या कार्यक्रमाला बोलावून मला मारहाण करण्यात आली. मात्र मी संयमी भूमिका घेतली. अहिंसेचा मार्ग मी निवडला. अहिंसेची भूमिका घेत मी सगळं बघत होते. इथून पुढेही मी अहिंसेचाच मार्ग मी निव़डणार आहे. मी तायक्वांडो ब्लॅकबेल्ट आहे. मी स्वत:चं संरक्षण स्वत: करू शकते. पण तरीही मी संरक्षणाची मागणी करते.

दरम्यान, संजय राऊत यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात विरोधी पक्षात आहे म्हणून एका महिलेवर हल्ला झाला आहे. पोलीस काय करात आहेत. पोलीस आयुक्तांना सवाल आहे. हीच का तुमच्या शहरातील महिलांची सुरक्षा. अयोध्या पौळ ही आमच्या महिला आघाडीची कार्यकर्ती आहे. सोशल मीडियावर ती सक्रिय असते. म्हणूनच तिला फसवून एका कार्यक्रमाला बोलावलं आणि तिथे तिच्यावर हल्ला झाला. याला डरपोकपणा म्हणतात, हिंमत असेल तर समोरासमोर या, असं आव्हान संजय राऊत यांनी दिलं. 

दरम्यान,काल कळव्यातील मनिषा नगर भागात अहिल्यादेवी होळकर जयंतीचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमात महापुरुषांच्या फोटोला हार घालताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला शेवटी हार का घातला म्हणून या वादाला सुरुवात झाली. त्यावेळी स्थानिक महिला मोठ्या संख्येने होत्या. ठाकरे गटाचा कार्यक्रम म्हणून अयोध्या पोळ यांना निमंत्रण देण्यात आले होते. मात्र कार्यक्रमस्थळी पोहचल्यानंतर हा पक्षाचा कार्यक्रम नसल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात अयोध्या पोळ यांनी कळवा पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यानंतर पोलीस स्टेशन बाहेर येताच  अयोध्या पोळ यांना काही महिलांनी मारहाण करण्यात आली. 

टॅग्स :Shiv Senaशिवसेनाthaneठाणे