शहरं
Join us  
Trending Stories
1
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
2
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूर स्थगित केलंय, थांबवलेलं नाही; मोदींचा पाकिस्तानला इशारा
3
"भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
4
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
5
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
7
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
8
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
9
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
10
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
11
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
12
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
13
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
14
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
15
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
16
Vikram Misri: जाहिरात क्षेत्रात नोकरी ते तीन पंतप्रधानांचे खासगी सचिव; कोण आहेत विक्रम मिस्री?
17
"मीही विराट कोहलीचा खूप मोठा फॅन..." भारतीय सैन्यदलाच्या पत्रकार परिषदेत म्हणाले DGMO !
18
सैफ-अमृताच्या घटस्फोटावर करीनाचं नाव घेत इब्राहिम अली खान म्हणाला असं काही.., वाचून व्हाल हैराण
19
तुर्की सरकारचा मोठा विजय, 40 वर्षांचा संघर्ष अखेर संपला; कुर्दीश बंडखोरांनी पत्करली शरणागती
20
मेजर प्रेरणा सिंह झाल्या लेफ्टनंट कर्नल; आजोबांना पाहून लहानपणीच पाहिलेलं देशसेवेचं स्वप्न

पोलीस करणार सुरक्षेबाबत जागृती!

By admin | Updated: December 8, 2015 01:20 IST

राज्य पोलीस दलातर्फे प्रतिवर्षी २ जानेवारीला ‘रेझिंग डे’ साजरा करण्यात येतो. यंदाच्या वर्षी वृद्धाश्रम, महिला, बालक, अल्पसंख्याक आदी घटकांच्या सुरक्षेसाठी आता पोलीस जनजागृती करणार आहेत.

मुंबई : राज्य पोलीस दलातर्फे प्रतिवर्षी २ जानेवारीला ‘रेझिंग डे’ साजरा करण्यात येतो. यंदाच्या वर्षी वृद्धाश्रम, महिला, बालक, अल्पसंख्याक आदी घटकांच्या सुरक्षेसाठी आता पोलीस जनजागृती करणार आहेत. पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी त्याबाबत राज्यातील सर्व घटकप्रमुखांना सूचना दिल्या आहेत. त्याचप्रमाणे अभिनव उपक्रम राबविण्याचे आवाहन अधिकाऱ्यांना केले आहे. केंद्र सरकारने २ जानेवारी हा दिवस महाराष्ट्र पोलीस दलाचा ‘रेझिंग डे’ घोषित केला आहे. त्यानिमित्ताने २ ते ८ जानेवारी या कालावधीत प्रत्येक आयुक्तालय व अधीक्षकाच्या कार्यक्षेत्रात विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. पोलीस अधिकाऱ्यांनी प्रत्येक वृद्धाश्रम, महिला मदत केंद्राला भेट देऊन त्यांच्यात सुरक्षिततेबाबत आत्मविश्वास वाढवावा, महाविद्यालये, स्वयंसेवी संस्थाच्या मदतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करावे, सुरक्षितेबाबत रॅली काढावी, त्याचप्रमाणे प्रत्येक पोलीस ठाण्यातील हद्दीतील शाळेतील प्रभारी अधिकाऱ्याने भेट देऊन विद्यार्थ्यांना खात्याच्या कामाबाबत माहिती द्यावी. या सर्व घटकांना पोलिसांच्या कामाची पद्धत, नियंत्रण कक्ष, हत्याराबाबत माहिती द्यावी, निबंध व चित्रकलेच्या स्पर्धांचे आयोजन करावे, त्याचप्रमाणे नागरिकांना सुरक्षितेबाबत मार्गदर्शन करणारी होर्डिंग लावावीत, अशा सूचना महासंचालक दीक्षित यांनी केल्या आहेत. त्याबरोबरच अन्य विधायक कार्यक्रम घ्यावेत, जेणेकरून नागरिकांना पोलिसांबाबत आपुलकी निर्माण होईल आणि ते कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तत्पर राहतील, असे दीक्षित यांनी म्हटले.