अमित सोमवंशी,
सोलापूर- सोलापूरच्या एव्हॉन लाईफ सायन्सेस लि. कंपनीने २०१२ व २०१४ या वर्षांत चेन्नई व रायगड येथील दोन कंपन्यांना डी.एल. इफेड्रीनची विक्री केली असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील आरोपी मनोज जैन याचा ताबा सोमवारी सोलापूर ग्रामीण पोलिसांना मिळणार असल्याचे वरिष्ठ सूत्रांनी नाव न छापण्याच्या अटिवर सांगितले़येथील चिंचोली एमआयडीसीतील एव्हॉन कंपनीत २३ टन इफेड्रीन जप्त करण्यात आल्यानंतर या प्रकरणी सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी एव्हॉन कंपनीच्या कामगारांची चौकशी केली. यात अनेक धागेदोरे त्यांच्या हाती लागले आहेत. या प्रकरणातील मुख्य आरोपींचा ताबा घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक मुंबईत दाखल झाले असून सोमवारी त्याचा ताबा मिळणार असल्याचे सांगण्यात आले़ एव्हॉन कंपनीने रायगड व चेन्नई येथील दोन कंपन्यांना २१ हजार किलो डी.एल. इफेड्रीन विकले आहे. २०१२मध्ये साडेआठ हजार किलो डी.एल. इफेड्रीन विकले. त्याची किमत २६ लाख २९ हजार १२० रुपये आहे. तर रायगड येथील एका कंपनीला १३ हजार किलो विकले त्याची मूळ किंमत १९ लाख १७ हजार १३२ रुपये आहे. ज्या कं पन्यांना डी.एल. इफेड्रीन विकले त्या कंपन्यांचीही चौकशी सुरू आहे़ सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुंबईतील अंमलीपदार्थ विरोधी न्यायालयात अर्ज सादर केला होता. त्यानुसार मनोज जैन याचा ताबा मिळणार आहे. - विजय कुंभार, स्थानिक गुन्हे शाखा