शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

राज्य सरकारकडून खडसेंवर कारवाईस टाळाटाळ

By admin | Updated: February 7, 2017 05:37 IST

पुण्याजवळील भोसरी एमआयडीसी जमीन खरेदी प्रकरणी माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्यावर कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याचे सांगत

मुंबई : पुण्याजवळील भोसरी एमआयडीसी जमीन खरेदी प्रकरणी माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्यावर कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याचे सांगत, प्रसंगी तपास अन्य यंत्रणांकडे सोपवावा लागेल, अशा कडक शब्दांत उच्च न्यायालयाने सोमवारी राज्य सरकारला खडसावले. झोटिंग समितीचा अहवाल प्रतीक्षेत असल्याची सबब पुढे करत, राज्य सरकार एकनाथ खडसेंवर कायदेशीर कारवाई करण्यास टाळाटाळ करत आहे, असे निरीक्षण नोंदवून न्या. रणजीत मोरे व न्या. शालिनी फणसाळकर-जोशी यांच्या खंडपीठाने नाराजी व्यक्त केली. सरकारने आत्तापर्यंत काय पावले उचलली, असे विचारत या संदर्भात अहवाल सादर करण्यासाठी राज्य सरकारला एक आठवड्याची मुदतवाढ दिली. ‘ही शेवटची संधी आहे. पुढील आठवड्यात अहवाल सादर केला नाही, तर न्यायालयाला आदेश देण्यासाठी भाग पाडले जाईल,’ असे स्पष्ट करत, खंडपीठाने एमआयडीसीलाही जमिनीच्या व्यवहाराप्रकरणी तपशीलवार माहिती प्रतिज्ञापत्राद्वारे सादर करण्याचे निर्देश दिले. कोट्यवधी रुपयांचा फायदा करण्यासाठी एकनाथ खडसेंनी महसूल मंत्रिपदाचा दुरुपयोग करून, भोसरी एमआयडीसीने संपादित केलेली सुमारे तीन एकर जमीन अवघ्या तीन कोटी ७५ लाख रुपयांत विकत घेतली. ही जमीन त्यांनी त्यांची पत्नी व जावयाच्या नावावर केली आहे, अशा आशयाची याचिका पुण्यातील बांधकाम व्यावसायिक हेमंत गावंडे यांनी केली आहे. एकनाथ खडसे यांनी भोसरीतील विकत घेतलेली जमीन एमआयडीसीने ९९ वर्षांच्या भाडेतत्त्वावर अनेक कंपन्यांना दिली. मात्र, त्यानंतरही २८ एप्रिल २०१६ रोजी ही जमीन मंदाकिनी खडसे व खडसे यांचे जावई गिरीश दयाराम चौधरी यांच्या नावावर करण्यात आली. एमआयडीसीची जमीन असताना व्यवहार मुद्रांक शुल्क विभागाने नोंदवून कसा घेतला नाही? असा सवाल याचिकेद्वारे करण्यात आला आहे.