शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

एसटीच्या ताफ्यात आॅटोमॅटिक गेअरची 'स्कॅनिया' बस

By admin | Updated: July 18, 2016 20:09 IST

एस.टी.महामंडळाच्या ताफ्यात अत्याधुनिक तंत्रज्ञान,आरामदायक व्यवस्था असलेली स्कॅनिया बस दाखल झाली आहे. विशेष म्हणजे ही बस आॅटोमॅटिक गेअर असलेली आहे.

ऑनलाइन लोकमतऔरंगाबाद, दि. १८ -  एस.टी.महामंडळाच्या ताफ्यात अत्याधुनिक तंत्रज्ञान,आरामदायक व्यवस्था असलेली स्कॅनिया बस दाखल झाली आहे. विशेष म्हणजे ही बस आॅटोमॅटिक गेअर असलेली आहे. त्यामुळे वारंवार गेअर बदलण्याच्या कटकटीपासून चालकांची सुटका होत आहे. शिवाय इंधन बचतीलाही यातून हातभार लागत आहे.खाजगी बससेवेला टक्कर देण्यासाठी एस.टी.महामंडळ आपली पारंपारिक ओळख पुसून आता आधुनिकतेकडे वाटचाल करीत आहे. एस.टी.महामंडळातर्फे लाल बस,एशियाड बस आणि काही मार्गांवर शिवनेरी (व्हाल्वो)बससेवा चालविली जाते. प्रवाशांच्या सुविधेसाठी लाल बस आणि एशियाड बसमध्ये कमालीचा बदल करण्यात आला आहे. नव्या लाल बसगाड्यांमधील आसन व्यवस्था अधिक आरामदायक केली जात आहे. तर एशियाड बसमध्ये पुशबॅक आसन व्यवस्था देण्यात येत आहे. वातानुकूलित प्रवासासाठी शिवनेरी बससेवा दिली जाते. आता अधिक आरामदायक प्रवासासाठी स्कॅनिया बस प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली आहे. पुणे-औरंगाबाद मार्गावर व्हॉल्वो बससह स्कॅनिया बसेसच्या माध्यमातून शिवनेरी बससेवा देण्यात येत आहे. स्कॅनिया बस बसेस आॅटोमॅटिक गेअरयुक्त आहेत. त्यामुळे वारंवार गेअर बदलण्याची,क्लच दाबण्याचा चालकांचा त्रास कमी झाला आहे. शिवाय वारंवार गेअर बदलणे, क्लच दाबण्यातून इंधनाचा वापर अधिक होतो. परंतु या बसगाड्यांच्या माध्यमातून इंधनाची बचत होईल. या बसमधील आरामदायक आसन व्यवस्था,सीसीटीव्ही कॅमेरा, प्रत्येक आसनाजवळ ध्वनी व्यवस्थासह अत्याधुनिक यंत्रणेने ही बस सज्ज आहे. त्यामुळे खाजगी वाहतूकदारांशी खऱ्या अर्थाने तोडीस तोड स्पर्धा सुरू केल्याचे दिसते.चालकांना खास प्रशिक्षणआजघडीला पुणे-औरंगाबाद मार्गावर स्कॅनियाची बससेवा सुरू आहे. औरंगाबाद विभागासाठी लवकरच दोन स्कॅनिया बसेस प्रात्प होणार आहेत. यासाठी विभागातील चालकांना पुणे येथे खास प्रशिक्षण दिले जात आहे. त्यासाठी चालक रवाना झाल्याची माहिती महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली.