शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

ऑस्ट्रेलियन विद्यार्थीनीचा टॅक्सीत विनयभंग

By admin | Updated: January 29, 2017 01:25 IST

चालत्या टॅक्सीत सीट बेल्ट लावण्याच्या नावाखाली टॅक्सीचालकाने आॅस्टे्रलियन विद्यार्थीनीचा विनयभंग केल्याची घटना कुलाबा येथे घडली. याप्रकरणी विद्यार्थीनीच्या तक्रारीवरुन

मुंबई : चालत्या टॅक्सीत सीट बेल्ट लावण्याच्या नावाखाली टॅक्सीचालकाने ऑस्ट्रेलियन विद्यार्थीनीचा विनयभंग केल्याची घटना कुलाबा येथे घडली. याप्रकरणी विद्यार्थीनीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी टॅक्सीचालकाला बेड्या ठोकल्या आहेत. जियाहुल अन्सारी (३०) असे टॅक्सीचालकाचे नाव असून त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. मुळची ऑस्ट्रेलियन असलेली २० वर्षीय विद्यार्थीनी २०१६ मध्ये एका संस्थेत शिक्षणासाठी मुंबईत आली. कुलाबा येथील हॉस्टेलमध्ये ती राहते. २० तारखेला रात्री साडेआठच्या सुमारास तिने सीएसटी येथून हॉस्टेलकडे जाण्यासाठी अन्सारीच्या टॅक्सीत बसली. मात्र मुंबईत सीट बेल्ट लावणे सक्तीचे असल्याचे सांगितले. आणि स्वत:च सीट बेल्ट लावण्याच्या नावाखाली विनयभंग केला तर पुढे चालत्या टॅक्सीतही सीट बेल्ट च्या नावाखाली त्याने पुन्हा तिच्यासोबत अश्लील चाळे केले. अखेर कुलाबा येथे सिग्नल लागताच विद्यार्थीनीने संधी साधून पळ काढला. २५ तारखेला कुलाबा येथून जात असताना अन्सारी तिला पुन्हा दिसला. तिने त्याचा पाठलाग केला आणि टॅक्सीचा क्रमांक घेतला. याबाबत तिने संस्थेतील महिलेला याबाबत सांगितले. अखेर महिलेच्या सांगण्यावरुन २६ जानेवारी रोजी तिने कुलाबा पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस उपायुक्त मनोज शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु केला. अशात परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने त्यांनी टॅक्सी चालकाची ओळख पटविली. त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली असल्याची माहिती पोलीस उपायुक्त मनोज शर्मा यांनी दिली. (प्रतिनिधी)