औरंगाबाद : औरंगाबादेतील पोलीस अधीक्षक कार्यालयाचा परिसर ‘इसिस’ हस्तकांच्या ‘टार्गेट’वर होता, अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांच्यासह हा परिसर उडविण्याचा अतिरेक्यांचा डाव होता, त्यासाठी अतिरेक्यांनी अधीक्षक कार्यालय व रेड्डी यांच्या शासकीय निवासस्थानाची रेकीही केली होती, अशी धक्कादायक बाब एटीएसच्या तपासात समोर आली आहे. खुद्द पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी त्याला दुजोरा दिला आहे. या परिसराची सुरक्षा कडक करण्यात आली असून, अधीक्षक रेड्डी यांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. परभणीतील नासेरबीन अबूबकर याफई ऊर्फ चाऊसावर ‘वॉच’ ठेवल्यानंतर नासेरबीनवर महाराष्ट्रात घातपात घडविण्याची जबाबदारी सोपविल्याची धक्कादायक बाब समोर आली. (प्रतिनिधी)>इसिस हस्तकांची रेकी : सतर्कतेच्या सूचनाएटीएसने अखेर १४ जुलै रोजी नासेरबीनच्या मुसक्या आवळल्या.त्या पाठोपाठ २३ जुलै रोजी त्याचा दुसरा साथीदार मोहंमद शाहिद मोहंमद कादर खान (२४, रा. रोशनमोहल्ला, परभणी) यालाही अटक केली. शाहिदकडे स्फोटकांचा साठाही सापडला. सध्या दोन्ही अतिरेकी एटीएसच्या कोठडीत असून त्यांच्याकडून अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहे. सध्याचे पोलीस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी हे काही महिन्यांपूर्वी औरंगाबाद विभागाचे एटीएसप्रमुख होते आणि त्यांच्याच कार्यकाळात २६ मार्च २०१५ रोजी औरंगाबादेतील हिमायतबाग परिसरात सिमीच्या अतिरेक्यांचे एन्काऊंटर करण्यात आले होते. याशिवाय रेड्डी यांच्या काळातच अतिरेकी कारवायांना बराच झटका बसला होता.त्यामुळे रेड्डी यांच्यासह तत्कालीन निरीक्षक शिवा ठाकरे व त्यांच्या पथकातील पोलीस हे विविध अतिरेकी संघटनांच्या हिटलिस्टवर होते. परभणीतील नासेरबीन अबूबकर याफई ऊर्फ चाऊसावर ‘वॉच’ ठेवल्यानंतर गंभीर बाबी समोर आल्या.
औरंगाबादचे ‘एसपी’ कार्यालय ‘टार्गेट’वर
By admin | Updated: August 5, 2016 04:57 IST