शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादकरांना ‘स्पा’ संस्थेचा ठेंगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2019 03:57 IST

राज्य शासनाने वारंवार घोषणा करूनही संस्थेचा निर्णय होईना

औरंगाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने २०१४ च्या अर्थसंकल्पात महाराष्ट्रात स्कूल आॅफ प्लॅनिंग अ‍ॅण्ड आर्किटेक्चर संस्था (स्पा) स्थापन करण्याची घोषणा केली. मराठवाड्याचे शैक्षणिक मागासलेपण दूर करण्यासाठी ही संस्था औरंगाबादेत स्थापन करण्याचा निर्णय राज्य शासनाने २०१४ मध्ये झालेल्या हिवाळी अधिवेनशात केला होता. त्यास पाच वर्षे पूर्ण झाली तरी अद्यापही औरंगाबादकरांना काहीच मिळाले नाही.राज्यात स्थापन होणारी आयआयएम सुरू करण्यासाठी औरंगाबादकरांसह उद्योजकांनी आंदोलन सुरू केले होते. जनमताचा रेटा वाढल्यामुळे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी नागपूर येथे झालेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आयआयएम ही संस्था नागपूर येथे स्थापन करण्याची घोषणा केली. ही घोषणा करतानाच औरंगाबादला स्पा संस्थेची घोषणा करण्याचा निर्णय जाहीर केला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या दबावामुळे औरंगाबादला मिळणारी आयआयएम संस्था नागपूरला पळविण्यात आल्याचा आरोपही तेव्हा शहरवासीयांनी केला होता. मात्र, स्पासह राष्ट्रीय विधि विद्यापीठ स्थापन करीत औरंगाबादला न्याय देण्याची भूमिका राज्य शासनाने जाहीर केली. यास पाच वर्षे पूर्ण होत आली आहेत, तरीही ‘स्पा’ संस्थेचा शुभारंभ अद्यापही झालेला नाही.केंद्रीय नगरविकास आणि मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडून मान्यता मिळाल्यानंतर ही संस्था औरंगाबादेत सुरू होऊ शकलीअसती. मात्र, राज्य शासनाने केलेल्या दुर्लक्षामुळे हा विषय मार्गी लावण्यात आलेला नाही. २०१७ मध्ये ही संस्था पुण्यात हालविण्याचा प्रयत्न सुरू असतानाच ९ डिसेंबर २०१७ रोजी महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा ‘स्पा’ संस्था तात्काळ सुरू करण्यात येईल, अशी घोषणा केली. या घोषणेलाही दोन वर्षे होत आली आहेत.‘स्पा’ संस्थेच्या मागणीसाठी केंद्र आणि राज्य शासनाला प्रत्येक दिवशी सोशल मीडियातून अभियान राबविले होते. संस्थेच्या उभारणीसाठी सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात जागेची पाहणी केली होती. मात्र, पुढे काही झाले नाही. पुन्हा केंद्रात भाजपचे सरकार आले आहे आतातर निर्णय होईल अशी अपेक्षा करतो.-डॉ. जितेंद्र देहाडे, अधिसभा सदस्य, विद्यापीठ

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी