शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादमध्ये दरोडेखोरांचा धुमाकूळ, ६७ हजार रुपये पळवले

By admin | Updated: March 13, 2016 22:37 IST

कुटुंबीय गाढ झोपेत असताना दरोडेखोरांनी दोन घरांवर हल्ला चढवला. कुलूप तोडून घरात घुसलेल्या दरोडेखोरांनी झाल्टा येथे रविवारी पहाटे २ ते ३ वाजेच्या सुमारास धुमाकूळ घातला.

औरंगाबाद : कुटुंबीय गाढ झोपेत असताना दरोडेखोरांनी दोन घरांवर हल्ला चढवला. कुलूप तोडून घरात घुसलेल्या दरोडेखोरांनी लोखंडी रॉड, लाठ्या-काठ्यांनी मारहाण करीत झाल्टा येथे रविवारी पहाटे २ ते ३ वाजेच्या सुमारास धुमाकूळ घातला. यात चौघे जखमी असून दोन जण गंभीर आहेत. त्यांच्यावर खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरूआहेत. रेखा दीपक शिंदे, वाळोबा गवळी अशी गंभीर जखमींची नावे आहेत. या प्रकरणी चिकलठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पोलिसांनी सांगितले की, दीपक शेषराव शिंदे (रा. झाल्टा) यांच्या बंगल्यात तीन दरोडेखोरांनी पहाटे ३ च्या सुमारास दरोडा घातला. शिंदे कुटुंबीय झोपेत असतानाच घराचा कडीकोंडा तोडून ते बंगल्यात घुसले. दीपक यांच्या पत्नी रेखा यांच्या खोलीत शिरून त्यांच्यावर चाकूने वार केले. त्यांचे वडील व अन्य नातेवाईकांना धमकावून दरोडेखोरांनी कपाटे उचकटली. आतून सोन्याची एकदाणी, अंगठ्या पोत, मोबाईल, अशा वस्तू लंपास केल्या. शिंदे यांच्या घरी धुमाकूळ घातल्यानंतर दरोडेखोरांनी आपला मोर्चा गजानन नंदू सुरासे यांच्या घराकडे वळवला. त्यांच्या घरावर चालून गेलेल्या दरोडेखोरांनी कुलूप तोडून आत प्रवेश केला. येथेही दरोडेखोरांनी कुटुंबियांना लाठ्या-काठ्यांनी मारहाण केली. घरातून रोकड आणि सोन्याचे दागिने मिळून ६७ हजार रुपयांचा ऐवज लुटला. चोरीचा प्रकार सुरू असतानाच सागर सुरासे यांना जाग आली. त्यांची दरोडेखोरांसोबत झटापट झाली. दरोडेखोरांनी त्यांच्यावर चाकूने वार केले. दरोड्याचा हा प्रकार लक्षात येताच शेजाऱ्यांनी एकाला पकडण्याचा प्रयत्न केला; परंतु दरोडेखोरांनी बाळू सुरासेंच्या डोक्यात वार केला. यात ते जखमी झाले. त्यानंतर दरोडेखोरांनी घटनास्थळावरून काढता पाय घेतला.