औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश चिटणीस शिवाजी बनकर पाटील यांनी आज एका पत्रकार परिषदेत बंडखोरीची भाषा बोलून दाखविली. गंगापूर- खुलताबाद मतदारसंघात मागील वेळी पक्षाच्या विरोधात बंडखोरी केलेले कृष्णा पाटील डोणगावकर यांचे नाव पुढे केले जात असल्याचे सांगून त्यांनी जिल्हाध्यक्ष सुधाकर सोनवणे यांच्यावरही टीका केली.बनकर हे गंगापूर- खुलताबाद मतदारसंघातून इच्छुक आहेत. त्यांनी मुंबईत पक्षाच्या नेत्यांसमोर मुलाखतही दिली आहे. पक्षाचे तिकीट मिळण्याची खात्री नसल्याने बंडखोरीची भाषा आहे का, यावर बंडखोरी केलेल्यांचे शुद्धीकरण केले जात असेल तर मीही बंडखोरी करतो; मला पुढच्या वेळी तिकीट द्या, असा भलताच फॉर्म्युला त्यांनी सुचविला. जिल्हाध्यक्ष सुधाकर सोनवणे यांच्या मनमानी कारभारामुळे अनेक जण पक्ष सोडत असल्याचा आरोपही त्यांनी केला. सुधाकर सोनवणे यांनी बंडखोरी करणाऱ्यांना तिकीट मिळवून देण्याचा घाट घातला आहे, असे बनकर म्हणाले.
औरंगाबाद राष्ट्रवादीत बंडखोरी !
By admin | Updated: September 11, 2014 03:11 IST