शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Nawab Malik : नवाब मलिकांकडून पत्रकार परिषदेपूर्वी ऑडियो क्लिप ट्विट; सॅनविल - NCB अधिकाऱ्यांमध्ये संवाद असल्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2021 09:32 IST

Nawab Malik : या क्लिपमध्ये सॅनविल डिसुझा आणि एनसीबीचे अधिकारी व्ही व्ही सिंह यांच्यातील संवाद असल्याचा दावा नबाव मलिक यांनी केला आहे. 

मुंबई : मुंबईतील क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात (Mumbai Cruise drug party case) आरोप-प्रत्यारोपांची मालिका थांबायचे नाव घेत नाही. या प्रकरणात राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) आज आणखी एक मोठा गौप्यस्फोट करणार आहेत. या संदर्भात नवाब मलिक आज सकाळी 10 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. मात्र, यापूर्वी नवाब मलिक यांनी एक ऑडियो क्लिप ट्विट केली आहे. या क्लिपमध्ये सॅनविल डिसुझा आणि एनसीबीचे अधिकारी व्ही व्ही सिंह यांच्यातील संवाद असल्याचा दावा नबाव मलिक यांनी केला आहे. 

नवाब मलिक यांनी ट्विट केलेल्या दाव्यानुसार, क्लिपमध्ये सॅनविल डिसुझा आणि एनसीबीचे अधिकारी व्ही व्ही सिंह यांच्यातील संवाद आहे. यामध्ये सॅनविल हा एनसीबी अधिकारी सिंह यांना नोटिशीबाबत विचारणा करत आहे. दरम्यान, हा संवाद हिंदी भाषेत आहे. तो मराठीत असा आहे...

सॅनविल- सर सॅनविल बोलतोयव्ही व्ही सिंह- कोन सॅनविलसॅनविल- सर, तुम्ही एक नोटिस दिली आहे ना मला.सिंह- अच्छा, सॅनविल, सॅनविल.. बांद्र्यात राहतो ना तू.सॅनविल- हो, सर. मी जरा बाहेर होतो. माझी तब्येत बरी नव्हती. मला माहिती मिळाली. सिंह- मग आता परत ये.सॅनविल-  मी अजून पोहोचलेलो नाही. तब्येतही खराब आहे. सर मला एक दिवस हवा आहे आणखी.सिंह- मग कधी येशीलसॅनविल-  मी सोमवारी येऊ का?सिंह- सोमवारी नको मग तू बुधवारी ये. सोमवारी मी नाही.सॅनविल-  ओके सर.सिंह- आणि ऐक. मोबाईल घेऊन ये. मला आता जास्त नाटकं नको आहेत. माझ्याकडे तुझा IMI नंबर आहे. तोच फोन घेऊन ये. मी तुला आधीच वॉर्निंग देतोय.सॅनविल-  ओके, सर मी तसं नाही करणारसिंह- ओके. मग बुधवारी ये.

दरम्यान, शनिवारी भाजपाचे नेते मोहित कंबोज यांनी पत्रकार परिषद घेत ड्रग्ज पार्टी प्रकरणावरुन राष्ट्रवादीवर गंभीर आरोप केले होते. या सर्व प्रकरणात सुनील पाटील नावाचा व्यक्ती मास्टरमाईंड असल्याचा आरोप मोहित कंबोज यांनी केला होता. त्यानंतर नवाब मलिक यांनी ट्विट करत मोहित कंबोज यांना प्रत्यु्त्तर दिले होते. या संदर्भात नवाब मलिक आज सकाळी 10 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत.  एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांना या प्रकरणाच्या चौकशीतून हटवण्यात आले आहे. त्यामुळे समीर वानखेडेंवर सातत्याने तोफ डागत असलेल्या नवाब मलिकांच्या आजच्या पत्रकार परिषदेत तोफेच्या तोंडी कोण असणार याकडे सर्वांचे लक्ष्य आहे.

टॅग्स :nawab malikनवाब मलिकNCBनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो