शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

५० लाखांच्या वसुलीसाठी दीड कोटींच्या प्रॉपर्टीचा लिलाव; महारेराचा बिल्डरला दणका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2023 06:34 IST

पनवेलपाठोपाठ पुण्यात कारवाई, महारेराने जारी केलेल्या वॉरंटसच्या वसुलीसाठी पनवेलपाठोपाठ आता पुण्यातही बिल्डरच्या मिळकतीचा लिलाव जाहीर झाला आहे.

मुंबई : महारेराने मॉड्युलर कन्स्ट्रक्शनला विलंबासाठी ग्राहकाला ४९ लाख ८ हजार ३७६ रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले होते. मात्र बिल्डरने तक्रारदाराला मुदतीत पैसे दिले नाहीत. महारेराने त्यामुळे यासंदर्भात वॉरंट वसुलीसाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविल्यानंतर बिल्डरची विष्णू प्रसाद अपार्टमेंटमधील दीड कोटी रुपये किमतीची ८३.२८ चौरस मीटर क्षेत्र मिळकत जप्त करून लिलाव जाहीर करण्यात आला आहे. १० मे रोजी तहसीलदार कार्यालयात हा लिलाव होणार आहे.

महारेराने जारी केलेल्या वॉरंटसच्या वसुलीसाठी पनवेलपाठोपाठ आता पुण्यातही बिल्डरच्या मिळकतीचा लिलाव जाहीर झाला आहे. महारेराने पुणे भागात विविध तक्रारींच्या अनुषंगाने २२७ वॉरंट्स जारी केलेले आहेत. या वॉरंट्सची एकूण रक्कम १७०.३७ कोटी आहे. यापैकी ३९ प्रकरणी ३२.९२ कोटी आतापर्यंत वसूल झाले आहेत. आता शिवाजीनगर भांबुर्डा भागातील बिल्डरला महारेराने दणका दिला असून, पुणे शहर तहसीलदारांनी याबाबत कारवाई केली आहे. बिल्डरला हा लिलाव थांबवायचा असेल तर वॉरंट आणि यासाठी देण्यात आलेल्या जाहिरातीची रक्कम ५ मे पूर्वी त्याला द्यावी लागणार आहे. 

महारेरा काय करते ?घर खरेदीदारांना बिल्डरने वेळेवर ताबा न देणे, प्रकल्प अर्धवट सोडणे, गुणवत्ता न राखणे अशा तक्रारी महारेराकडे येतात.घर खरेदीदारांच्या तक्रारींवर सुनावणी होऊन व्याज, नुकसान भरपाई, परतावा देण्याचे आदेश बिल्डरला दिले जातात.बिल्डरने रक्कम दिली नाहीतर ती वसूल करण्यात जिल्हाधिकारी कार्यालयाची भूमिका महत्त्वाची असते.महारेराकडून म्हणून असे वॉरंटस जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविले जातात.