शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

सावधान नागरिकहो... शहरात स्वाईन फ्लू आलाय..!

By admin | Updated: February 26, 2015 00:09 IST

यंत्रणा सतर्क : तपासणी अहवाल येण्यास विलंब, नागरिकांचे प्रबोधन करण्याची कोणतीही यंत्रणा नाही

सचिन लाड - सांगली --देशात आणि राज्यात थैमान घातलेल्या ‘स्वाईन फ्लू’ या संसर्गजन्य आजाराने सांगलीत शिरकाव केलाय. स्वाईनची लागण झालेली एक महिला रुग्ण सापडली आणि तिचा काही तासातच मृत्यू झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दररोज एक-दोन संशयित रुग्ण शासकीय रुग्णालयात दाखल होत आहेत. खासगी रुग्णालयातही स्वाईनचे संशयित रुग्ण उपचार घेत आहेत. सांगलीसह, कोल्हापूर जिल्हा व कर्नाटकातील संशयित रुग्ण सांगलीमध्ये उपचारार्थ दाखल होत आहेत. संशयित रुग्णांच्या घेण्यात आलेल्या रक्ताच्या नमुन्यांचा तपासणी अहवाल प्राप्त होण्यास विलंब लागत आहे. लागण होऊ नये, यासाठी काय काळजी घ्यावी...संशयित रुग्ण किंवा स्वाईन फ्लू झालेल्या रुग्णाजवळ (सहा फुटाच्या आत) जाऊ नये.पौष्टिक आहार घ्यावाभरपूर पाणी प्यावे.हस्तांदोलन व सार्वजिनक ठिकाणी थुंकू नये. सर्दी, खोकला असलेल्या रुग्णांपासून दूर रहावे.लिंबू, आवळा, मोसंबी, संत्री, हिरव्या पालेभाज्या यासारख्या सी-व्हिटॅमीन असलेल्या पदार्थांचा आहारात वापर करावा. चित्रपटगृह, नाट्यगृह, मॉल्स यासह अन्य गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये.बाहेरून जाऊन आल्यानंतर साबणाने हात धुवावेत. कारण स्वाईन फ्लूचे विषाणू लागण झालेल्या रुग्णांच्या खोकल्यातून, शिंकांतून बाहेर पडतात. हे विषाणू टेबल, खुर्ची, एसटी बस, रेल्वे अशा आसपासच्या ठिकाणी जाऊन स्थिरावून तीन ते आठ तास जिवंत राहतात. यासाठी नाक व चेहऱ्यास हात लावण्याचे टाळावे.काय करावे?आपल्या फॅमिली डॉक्टरकडे किंवा जवळच्या शासकीय रुग्णालयात तपासणीसाठी दाखल व्हावे.जाताना नाका-तोंडाला रुमाल किंवा मास्क लावावा.काळजी कोणी घ्यावीगदोदर महिलावृद्ध महिला व पुरुषपाचपेक्षा कमी वयाची मुलेएचआयव्ही लागण झालेले रुग्णमधुमेह, दमा, हृदयविकार असणारे रुग्णरुग्णांनी काय करावे.संशयित रुग्णांनी घराबाहेर पडू नये. मास्कचा वापर करावा.रुग्णालयातून मिळणाऱ्या औषधांचा कोर्स पूर्ण करावा.शिंकताना, खोकताना रुमाल नाका-तोंडापुढे धरावा.घरातील फरशी, टेबल फिनेलमिश्रित पाण्याने दररोज पुसावे.भरपूर पाणी प्यावे, व्यवस्थित आहार घ्यावा.सर्व लक्षणे गेल्यानंतर एक दिवस घरीच थांबाबे.स्वाईन फ्लूची शंका कधी घ्यावी?घसा दुखणे, खोकला असेल व त्यासोबत सतत दोन दिवस शंभरच्या वर ताप असेल.तापासोबत केव्हाही दम लागला, तर ते गंभीर लक्षण समजून तातडीने उपचारासाठी दाखल व्हावे.मागील आठ दिवसात परदेश प्रवास झाला असेल.स्वाईन फ्लूच्या रुग्णांशी निकटचा संपर्क आल्यास.