पुणे : मंगळवार पेठेतील नागझरी येथे २ मांडुळे विक्रीसाठी आलेल्यास फरासखाना पोलिसांनी अटक केली़ शिवकुमार अनिल पोहार (वय२४, रा़ घाटी मेडिकल क्वाटर्स, औरंगाबाद) असे त्याचे नाव आहे़ त्याकडून २ मांडुळे ताब्यात घेण्यात आली असून त्याची किंमत ५ लाख रुपये आहे़ याप्रकरणी वनरक्षक सागर होले यांनी फिर्याद दिली आहे़ फरासखाना पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचारी गस्त घालत असताना तपास पथकातील सागर केकाण यांना याबाबतची माहिती मिळाली़ त्यांनी नागझरी येथे सापळा रचून पोहार याला पकडले़ त्याच्याकडे चार फूट लांबीचा व दीड किलो वजनाचा एक तसेच दुसरा साडेतीन फूट लांब आणि एक किलो वजनाचे असे २ मांडूळ आढळून आले़ ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रेखा साळुंखे, पोलीस निरीक्षक राजेंद्र चव्हाण, जयराम पायगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक महेंद्र जाधव, पोलीस कर्मचारी इकबाल शेख, बापू खुटवड, विनायक शिंदे, सागर केकाण, अमेय रसाळ, बाबासाहेब गोरे, संदीप पाटील, सुधीर सपकाळ यांनी केली़
मांडुळे विक्रीसाठी आणणारा अटकेत
By admin | Updated: July 20, 2016 00:37 IST