शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

विधान परिषद निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 06:13 IST

मुंबई : माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे ७ डिसेंबरला होणारी विधान परिषदेची निवडणूक लढणार नाहीत हे जवळपास स्पष्ट असताना आता ही निवडणूक बिनविरोध करण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रयत्न असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

मुंबई : माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे ७ डिसेंबरला होणारी विधान परिषदेची निवडणूक लढणार नाहीत हे जवळपास स्पष्ट असताना आता ही निवडणूक बिनविरोध करण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रयत्न असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.राणे उमदेवार नसतील तर शिवसेनेचा पाठिंबा भाजपाच्या उमेदवाराला मिळविण्यात मुख्यमंत्र्यांना कोणतीही अडचण येणार नाही. शिवसेनेचा पाठिंबा मिळविण्यात मुख्यमंत्र्यांना यश आले की भाजपाचा विजय ही केवळ औपचारिकता असेल. कारण, भाजपाचे १२२ आणि शिवसेनेचे ६३ मिळून १८५ आमदार होतात. २८८ सदस्यांपैकी १८५ मते भाजपाला मिळणार असतील तर ७ डिसेंबरच्या निवडणुकीआधीच भाजपाच्या विजयावर शिक्कामोर्तब झालेले असेल.अशा परिस्थितीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी करून उमेदवार देतील का हा प्रश्न आहे. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांनी विधान परिषदेची प्रत्येक निवडणूक बिनविरोध व्हावी असा प्रयत्न केला होता आणि त्यात त्यांना यशही आले होते. त्यावेळी त्यांनी भाजपा-शिवसेनेलाही विश्वासात घेतले होते. निवडणुकीतील घोडेबाजार टाळण्यासाठी आपण हा पुढाकार घेतल्याचे चव्हाण यांनी त्यावेळी स्पष्ट केले होते. त्याच धर्तीवर, यावेळी भाजपाचा उमेदवार बिनविरोध निवडून यावा, असा प्रयत्न मुख्यमंत्री फडणवीस करू शकतात, असे सूत्रांनी सांगितले.भाजपाकडून सध्या तीन नावे चर्चेत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपात आलेले प्रसाद लाड, भाजपाचे मुख्य प्रवक्ते माधव भंडारी आणि शायना एनसी यांच्यापैकी एकाला संधी दिली जाईल, असे म्हटले जाते. लाड यांना संधी देऊन भंडारी वा शायना एनसी यांना डावलल्यास निष्ठावानाऐवजी उपºयांना संधी दिल्याची टीका होऊ शकते. तथापि,निवडणूक बिनविरोध करण्यासाठी लाड यांच्या नावाला अन्य पक्षांकडून सहमती मिळू शकते.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNarayan Raneनारायण राणे