शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यातील नालेसफाईत बिले लाटण्याचा प्रयत्न, भाजपाचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2017 16:18 IST

दिव्यातील नालेसफाईत गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत कंत्राटदार, अधिकारी आणि लोकप्रतिनिधी हे संगनमताने कामे न करताच नालेसफाईचा

ऑनलाइन लोकमत
दिवा (ठाणे), दि. 14 - दिव्यातील नालेसफाईत गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत कंत्राटदार, अधिकारी आणि लोकप्रतिनिधी हे संगनमताने कामे न करताच नालेसफाईचा निधी लाटण्याच्या तयारीत असल्याचा आरोप भारतीय जनता पार्टी दिवा शीळ मंडळाने केला आहे. 
 
दिव्यात नालेसफाई झाल्याचा दावा प्रशासन,ठेकेदार आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्याकडून करण्यात येत आहे,मग दिव्यातील नाल्यात गवत रुजले कसे असा सवाल भाजपाकडून विचारला जात आहे. ज्या अर्थी नाल्यामध्ये गवत रुजले आहे त्या अर्थी नाल्यातील गाळ काढण्यात आला नसल्याकडे भाजपाने लक्ष वेधले .तसेच दिव्यातील अंतर्गत गटारे साफ करण्यासाठी 15 लाखांचा स्वतंत्र निधी मंजूर झाला होता,मात्र प्रत्यक्षात शहारातील अंतर्गत गटारे साफ न केल्याने रस्त्यांवर पाणी साचण्याचा प्रकार पहिल्याच पावसात घडला असल्याकडेही भाजपाने लक्ष वेधले आहे. नालेसफाईच्या गैर व्यवहाराकडे लक्ष वेधण्यासाठी व सदर प्रकारची  चौकशी करावी यासाठी भाजपाने एक दिवसीय लाक्षणिक उपोषणही केले.
 
रेल्वे कल्व्हाटर्स साफ करण्यासाठी 15 लाखांचा निधी मंजूर झाला मात्र महिना झाला तरी अवघे दोन रेल्वे कल्व्हाटर्स साफ झाले नसल्याने कामे न करता परस्पर निधी लाटण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप भाजपा कल्याण-डोंबिवली जिल्हा सरचिटणीस शिवाजी आव्हाड यांनी केला आहे.
यंदा दिव्यातील नालेसफाईसाठी 55 लाखांचा निधी,मात्र परिस्थिती जैसे थे...
यंदा दिवा विभागातील नालेसफाई साठी एकूण 55 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला.यामध्ये 15 लाख अंतर्गत गटारे,15 लाख रेल्वे कल्व्हाटर्स,आणि 25 लाख नालेसफाई असा निधी मंजूर झाला.प्रत्यक्षात दिव्यातील अनेक नाल्यांमध्ये गाळ अजूनही तसाच असून अनेक अंतर्गत नाले साफ करण्यात आले नसल्याचा आरोप भाजपाने केला आहे.
 
-दिव्यातील नालेसफाईत कंत्राटदार,स्थानिक नगरसेवक,आणि अधिकारी यांचा हातसफाई चा प्रयत्न होत आहे,सर्व सामान्य दिवेकरांच्या आरोग्याशी खेळलं जात आहे.यात गैर व्यवहार करणाऱ्यां अधिकारी आणि ठेकेदारावर फोउजदारी केस करण्याची मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे करणार आहोत.
-शिवाजी आव्हाड,स्थानिक नेते
भाजप,कल्याण-डोंबिवली शहर जिल्हा