शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना आमदार संजय गायकवाडांची गाडी जाळण्याचा प्रयत्न; जुना वाद उफाळून येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 11:20 IST

MLA Sanjay Gaikwad : शिवसेनेचे आ. संजय गायकवाड यांचे वाहन जाळण्याचा अज्ञातांनी प्रयत्न केल्याची घटना २६ मे रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास उघडकीस आली.

ठळक मुद्देसंजय गायकवाड हे २६ मे रोजी पहाटे दीड वाजता मुंबईवरून बुलडाण्यात आले होते.पहाटे तीन वाजेच्या सुमारास त्यांचे वाहन जाळण्याचा प्रयत्न झाला. जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद चावरिया यांनीही हे प्रकरण गांभिर्याने घेतले आहे.

बुलडाणा: आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे केल्या काही काळापासून चर्चेत असलेले बुलडाण्याचे शिवसेनेचे आ. संजय गायकवाड यांचे वाहन जाळण्याचा अज्ञातांनी प्रयत्न केल्याची घटना २६ मे रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास उघडकीस आली.आ. संजय गायकवाड यांचे वाहन जाळण्याचा प्रयत्न करण्यापूर्वी त्यांच्या जुनागाव परिसरातील वीज पुरवठाही खंडीत करण्यात आला होता. दोन अज्ञातांनी दुचाकीवर येऊन त्यांचे वाहन जाळण्याचा प्रयत्न केला असल्याची सध्या परिसरात चर्चा आहे.

दुसरीकडे या घटनेसंदर्भात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याशीही आ. संजय गायकवाड यांनी संपर्क साधला असून घडलेल्या प्रकाराची माहिती दिली आहे. त्यानंतर हे प्रकरण सध्या डीआयजीस्तरावरून हाताळण्यात येत आहे. स्थानिक गुन्हे शाखेसह, श्वान पथक, ठसे तज्ज्ञांचे पथकही सकाळीच आ. गायकवाड यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. त्यांनी पाहणी केली आहे.दरम्यान आ. संजय गायकवाड हे २६ मे रोजी पहाटे दीड वाजता मुंबईवरून बुलडाण्यात आले होते. त्यानंतर पहाटे तीन वाजेच्या सुमारास त्यांचे वाहन जाळण्याचा प्रयत्न झाला. त्यांच्या वाहनाच्या इंधनाच्या टाकीजवळचा भाग अज्ञातांनी पेटवून दिला होता. या वाहनाच्या समोर व मागे ही वाहने उभी होती. आगीचा भडका उडाला असता तर परिसरातील तीन ते चार वाहनेही जळाली असती, असे आ. गायकवाड यांनी ‘लोकमत’शी बोलतांना स्पष्ट केले. दुसरीकडे जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद चावरिया यांनीही हे प्रकरण गांभिर्याने घेतले आहे.

टॅग्स :Sanjay Gaikwadसंजय गायकवाडShiv Senaशिवसेनाbuldhanaबुलडाणा