शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

एटीएसमुळे पुण्यातील तरुणाची ‘घरवापसी’

By admin | Updated: November 19, 2015 01:59 IST

शिक्षणासाठी दुसऱ्या ठिकाणी गेल्यावर मित्रांच्या प्रभावाखाली येऊन धर्मांतर करणारा एक तरुण दहशतवादीविरोधी पथकाच्या प्रयत्नांमुळे घरी परतला.

- लक्ष्मण मोरे,  पुणेशिक्षणासाठी दुसऱ्या ठिकाणी गेल्यावर मित्रांच्या प्रभावाखाली येऊन धर्मांतर करणारा एक तरुण दहशतवादीविरोधी पथकाच्या प्रयत्नांमुळे घरी परतला. तो धार्मिक कट्टरपंथी विचारांकडेही झुकू लागला होता. आता त्याला या विचारांच्या पगड्यामधून बाहेर काढण्याचे प्रयत्न आईवडिलांकडून सुरू आहेत.पुण्याच्या एक तरुण २००८-०९ साली बीड जिल्ह्यात अभियांत्रिकीच्या शिक्षणासाठी गेला होता. तेथे घर मालकाच्या मुलाशी त्याची मैत्री झाली. नंतर या मित्राच्या धर्माप्रमाणेच त्याचे आचरण सुरू झाले. इंटरनेटवरच्या एका संकेतस्थळामुळे गुजरातमधील एका धर्मगुरुच्या तो संपर्कात आला. या धर्मगुरुने त्याला स्वत:च्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये घेत धर्मविषयक चर्चेत सहभागी केले. त्यानंतर या तरुणाने स्वत:चाही व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार केला. धर्मगुरुने दिलेल्या परदेशातील तरुणांचे क्रमांक त्याने या ग्रुपमध्ये घेतले. आणखी एका धर्मगुरुचे इंटरनेटवरचे धार्मिक आवाहनही त्याने ऐकले. कुटुंबियांना त्याच्या या हालचालींबाबत माहिती मिळाल्यावर त्यांनी त्याला घरी आणले. त्याचा मोबाईल काढून घेतला. मात्र, त्यानंतर या तरुणाने घरच सोडले. त्यानंतर या तरुणाने घरी जाण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा धर्मगुरुंनी तुला कोणीही स्वीकारणार नाही’, अशी भीती घातली. या तरुणाचा आईवडिलांशी अधूनमधून संपर्क होत होता. मुलाच्या या हालचाली पाहिल्यानंतर त्यांनी शेवटी एटीएसचे पुणे विभागाचे सहायक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे यांची भेट घेतली. बर्गे यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने त्याचा अहमदाबादपर्यंतचा माग काढला. परंतु त्याचा पुढील ठावठिकाणा समजत नव्हता. त्यामुळे केंद्रीय गुप्तचर यंत्रणांची मदत घेण्यात आली. पोलिसांनी त्याला समजावून परत येण्याविषयी विश्वासात घेतले. एटीएसच्या प्रयत्नांमुळे हा तरुण आॅक्टोबरमध्ये घरी परतला. कोणी कोणता धर्म स्वीकारावा, कोणत्या धर्माचे आचरण करावे हा प्रत्येकाचा अधिकार आहे; परंतु हा तरुण सोशल मीडियाद्वारे कट्टरपंथी विचारांकडे आकर्षित झाला होता. त्याचे या संदर्भात चॅटिंग चालायचे. त्यामुळे त्याला परावृत्त करणे आव्हान होते. - भानुप्रताप बर्गे, सहायक पोलीस आयुक्त