शहरं
Join us  
Trending Stories
1
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
2
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
3
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
4
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
5
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
6
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
7
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
8
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
9
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
10
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
11
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
12
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
13
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
14
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
15
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
16
डोनाल्ड ट्रम्प म्हणतात 'मी युद्ध थांबवलं'; इस्राइलनं गाझामध्ये ६० हजार सैनिकांना पाठवलं! काय आहे नवा प्लॅन?
17
6 एअरबॅग्ज, 35 Km मायलेज अन् ADAS सह लवकरच येतेय ही ढासू कॉम्पॅक्ट SUV; आणखी कोण कोणत्या कार होतायेत लॉन्च? बघा लिस्ट
18
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
19
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
20
Realme: ७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च!

तुजारपूरच्या आत्माराम निकम यांचे आळंदी ते पंढरपूर लोटांगण

By admin | Updated: June 16, 2017 19:31 IST

तुजारपूर (ता. वाळवा) येथील आत्माराम निकम (महाराज) यांनी पांडुरंगावरील गाढ श्रद्धेतून आळंदी ते पंढरपूर हे २८५ किलोमीटरचे अंतर चक्क लोटांगण घालत

 ऑनलाइन लोकमतइस्लामपूर (सांगली), दि. 16 - तुजारपूर (ता. वाळवा) येथील आत्माराम निकम (महाराज) यांनी पांडुरंगावरील गाढ श्रद्धेतून आळंदी ते पंढरपूर हे २८५ किलोमीटरचे अंतर चक्क लोटांगण घालत पूर्ण केले आहे. यासाठी त्यांना ४३ दिवस लागले. याबद्दल त्यांचा माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांच्या हस्ते ग्रामस्थांनी जाहीर सत्कार केला. यावेळी आ. पाटील यांनी, आत्माराम महाराज यांच्या  लोटांगणाची नोंद गिनीज बुकमध्ये व्हायला हवी, अशी अपेक्षा व्यक्त केली.६५ वर्षीय आत्माराम महाराजांनी २३ एप्रिलला लोटांगण घालण्यास सुरूवात केली. दररोज सकाळी ते लवकर लोटांगण घालायला सुरुवात करत. कधी ८, तर कधी ९ किलोमीटर अंतर पार केल्यावर ते थांबत. त्यावेळी त्यांच्याबरोबर तुजारपूरचे नाथ महाराज, तर काही दिवस सुरुलचे नारायण पाटील होते. ते जेथे लोटांगण थांबवत, त्या गावात जेवणाची काही सोय झाली तर ठीक, नाही तर स्वत: जेवण बनवत. त्यांनी घरासह गावातील कोणालाच हे सांगितले नव्हते. त्यामुळे पहिल्या १५ दिवसात याबद्दल कोणालाच माहिती नव्हती. मात्र १५ दिवसांनंतर गावाकडे त्यांच्या कुटुंबियांना समजले. त्यानंतर दररोज तुजारपूर, उरूणवाडी या गावातील भाविक आत्माराम महाराजांच्या या उपक्रमामध्ये सहभागी होऊ लागले.आत्माराम महाराज म्हणाले की, ग्रामदैवत भैरोबा, माझे आई, वडील व तुजारपूर, उरूणवाडी या गावातील लोकांच्या कृपाशीर्वादाने मी हे करू शकलो. आपण प्रपंचासाठी किती देह झिजवितो, मग देवासाठी थोडा देह झिजवायला नको का? भविष्यात नर्मदा परिक्रमा करणार आहे.गजानन लाहुडकर महाराज, पुण्याचे जगदीश बोधाटे, मांडवीचे मारुती साळुंखे यांचे त्यांना सहकार्य लाभले.राजारामबापू साखर कारखान्याचे अध्यक्ष पी. आर. पाटील यांनी आत्माराम महाराजांच्या उपक्रमाचे कौतुक करून, भविष्यात आध्यात्मिक प्रसारातून तरुणांतील व्यसनाधिनता कमी होऊ शकते, असा विश्वास व्यक्त केला. माजी सरपंच वसंतराव पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. सतीश पाटील व पंडित सुतार यांनी मान्यवरांचे स्वागत केले. ऋषिकेश पाटील याने आभार मानले. युवक कार्यकर्ता संतोष पाटील याने सूत्रसंचालन केले.या कार्यक्रमास राजारामबापू कारखान्याचे संचालक विराज शिंदे, पं. स. सदस्य जनार्दन पाटील, प्रकाश पाटील कराड, दीपक निकम शेरे, तुजारपूरचे कृष्णात बाबर, भीमराव बाबर, संचालिका सौ. मंगल बाबर, दूध संस्थेचे अध्यक्ष संभाजी पवार, रामचंद्र पाटील, हंबीरराव बाबर, संतोष बाबर, उरूणवाडीचे तुकाराम यादव, कृष्णात सासणे, विशाल निकम, शंकर गुरुजी, भास्कर पाटील, रमेश पाटील उपस्थित होते.