भिवंडी : शहरातील पोलीस नियंत्रण कक्षात काम करणारे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अशोक दगडू घोगरे (५६) यांचा रविवारी सकाळी ११.४५ वाजता ठाण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. रविवारी रात्री ९ वाजता नियंत्रण कक्षातून घरी गेल्यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. शासनाने पोलीस कर्मचाऱ्यांसाठी मेडिक्लेम सुविधा पुरविली आहे. तरीही त्यांना उपचारांसाठी ठाण्यातील हॉस्पिटलमध्ये जावे लागते. अत्यावश्यक वेळी शहरातील हॉस्पिटलमध्ये उपचाराची सोय करण्यात यावी, अशी मागणी पोलीस काही महिन्यांपासून करत आहेत.
साहाय्यक उपनिरीक्षकाचा हृदयविकाराने मृत्यू
By admin | Updated: September 14, 2015 02:05 IST