शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

पिण्याचे पाणी वापरल्याप्रकरणी विचारला जाब

By admin | Updated: March 22, 2016 01:56 IST

महापालिकेच्या विस्तारीत इमारतीच्या बांधकामासाठी महापालिका प्रशासनाकडूनच पिण्याचे पाणी वापरण्यात आल्याप्रकरणी नगरसेवकांनी मुख्य सभेत प्रशासनाला जाब विचारला

पुणे : महापालिकेच्या विस्तारीत इमारतीच्या बांधकामासाठी महापालिका प्रशासनाकडूनच पिण्याचे पाणी वापरण्यात आल्याप्रकरणी नगरसेवकांनी मुख्य सभेत प्रशासनाला जाब विचारला. त्यावर स्पष्टीकरण देताना महापालिका प्रशासनाची चांगलीच भंबेरी उडाली. एकीकडे प्रशासनाकडून पाण्याची नासाडी केली जात असल्याने प्रभागातील नागरिकांना पुरेसे पाणी मिळू शकत नसल्याची टीका सोमवारी नगरसेवकांनी केली.महापालिकेच्या विस्तारीत इमारतीच्या बांधकामाला पिण्याचे पाणी वापरले जात असल्याचा धक्कादायक प्रकार ‘लोकमत’ने उजेडात आला. या प्रकरणाची अतिरिक्त आयुक्तांमार्फत चौकशी करण्यात येणार असल्याचे आयुक्त कुणाल कुमार यांनी स्पष्ट केले आहे. महापालिकेच्या मुख्य सभेत सोमवारी याचे पडसाद उमटले. महापालिकेच्या विस्तारीत इमारतीसाठी २ कोटी रुपयांच्या निधीचे वर्गीकरण करण्याचा प्रस्ताव मुख्य सभेत मांडण्यात आला होता. त्या वेळी मनसेच्या नगरसेविका रूपाली पाटील यांनी वर्गीकरणाला विरोध नाही; मात्र त्याच्या बांधकामाला पिण्याचे पाणी वापरले जात असल्याबाबत प्रशासनाने खुलासा करावा, अशी मागणी केली. प्रभागातील नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नसल्याच्या सातत्याने तक्रारी येत असताना अशी पाणीटंचाई योग्य नसल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.विस्तारीत इमारतीसाठी खोदकाम करताना पाण्याचे झरे लागले असून, त्याचे पाणी बांधकामासाठी वापरले जात असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. तुम्ही बांधकामासाठी पिण्याचे पाणी वापरले असल्याचे पुरावे सादर करू असे सांगताच प्रशासनाकडून सावरासावर करण्यात आली.> बकेट खरेदीत अनियमिततामहापालिकेकडून २०१५-१६ या वर्षासाठी साडेसात लिटरच्या बकेटची खरेदी करण्यात आली. मात्र प्रत्यक्षात ठेकेदाराने सात लिटर क्षमतेचीच बकेट पुरविली असल्याचा आरोप नगरसेवक धनंजय जाधव यांनी केला. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी तपासणी न करता ते स्वीकारले कसे, याची विचारणा त्यांनी केली. या प्रकरणाची सखोल चौकशी करून कारवाई केली जाईल, असे अतिरिक्त आयुक्त प्रेरणा देशभ्रतार यांनी सांगितले. > शहरातील ५०० गोठ्यांचे होणार स्थलांतरशहरातील गोठे स्थलांतरित करण्यासाठी शासनाने मुंढवा येथे १५० एकर जागा उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार १५० गोठ्यांचे तिथे पुनर्वसन करण्यात आले आहे. मात्र, हे पुनर्वसन करण्यासाठी १९८४ चा आरोग्य परवाना त्या गोठामालकाकडे असावा, अशी अट घालण्यात आली आहे. त्यामुळे अनेक गोठ्यांचे पुनर्वसन रखडले असल्याची माहिती आरोग्यप्रमुख एस. टी. परदेशी यांनी सभागृहाला दिली. ही अट शिथिल करण्याच्या ठरावास मुख्य सभेने मंजुरी दिली. त्यामुळे गोठ्यांच्या स्थलांतराचा मार्ग मोकळा झाला आहे.