शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

आशियातील सर्वात लांब डबल डेकर पूल; ११ डिसेंबरला होणार पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्धाटन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2022 13:35 IST

सद्यस्थितीतील वाहतूक आणि पादचारी भुयारी मार्ग हा सर्वात खालचा स्तर आहे तर त्याच्या वरती असलेला रेल्वे ट्रॅक हा दुसरा स्तर आहे. राष्ट्रीय महामार्ग तिसरा आणि मेट्रो मार्ग चौथा स्तर सुरू आहे.

नागपूर - शहरातील चार-स्तरीय वाहतूक कॉरिडॉर हा आशियातील सर्वात लांब डबल-डेकर (मेट्रो-कम-नॅशनल हायवे) मार्गाचा भाग आहे. याचं येत्या ११ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पहिल्या टप्प्याचं उद्धाटन होणार असून हा पूल मेट्रो मार्गांमधील प्रमुख आकर्षण असेल. भारताच्या मेट्रो रेल्वे बांधकामाच्या इतिहासातील एक निर्णायक क्षण ठरेल. कस्तूरचंद पार्क ते ऑटोमोटिव्ह स्क्वेअर (लाइन-1) आणि झाशी राणी स्क्वेअर ते प्रजापती नगर (लाईन-२) हा मेट्रो मार्ग नागपूरच्या जनतेसाठी खुला केला जाणार आहे. 

चार-स्तरीय वाहतूक कॉरिडॉरमध्ये जमिनीपासून २८ मीटर उंचीवर थेट रेल्वे ट्रॅक ओलांडून 18.9M रुंद स्टील गर्डरमधून तयार झाले आहे. असे अनोखे बहुस्तरीय परिवहन नेटवर्क देशात प्रथमच पाहायला मिळणार आहे. सद्यस्थितीतील वाहतूक आणि पादचारी भुयारी मार्ग हा सर्वात खालचा स्तर आहे तर त्याच्या वरती असलेला रेल्वे ट्रॅक हा दुसरा स्तर आहे. राष्ट्रीय महामार्ग तिसरा आणि मेट्रो मार्ग चौथा स्तर सुरू आहे. हा एकूण ५.३ किमी असलेला आशियातील सर्वात लांब डबल-डेकर व्हायाडक्टचा भाग आहे.  

अफकॉन्सने दोन महिन्यांच्या विक्रमी वेळेत १६५० MT वजनाचा हा ८० M डबल-डेकर स्टील स्पॅन उभारला आहे. गड्डीगोदाम रेल्वे क्रॉसिंगवर जिथून दररोज १५० हून अधिक रेल्वे आणि एक लाखाहून अधिक वाहने जातात त्यावरती स्टील सुपरस्ट्रकचर (Steel Superstructure) ठेवण्यात आले. अवाढव्य 18.9M रुंद गर्डरचे लाँचिंग (Girder Launching) ही भारतीय रेल्वेतील बहुधा पहिलीच घटना आहे.

८००० स्ट्रक्चरल घटकांसह १६५० MT स्ट्रक्चरल स्टीलसह तयार केलेला डबल-डेकर ओपन वेब गर्डर (OWG) हा गेल्या हिवाळ्यात गड्डीगोदाम रेल्वे क्रॉसिंगवर ठेवण्यात आला. ह्या मार्गावरील वर्दळ पाहता ही सर्व कामे रेल्वे ब्लॉकच्या वेळेत करण्यात आली. स्पॅन (Span) जमिनीपासून २८ मीटर उंचीवर आहे. इतकं आव्हानात्मक कामाचा भारतात यापूर्वी कधीही प्रयत्न झाला नव्हता असं अफकॉन्सचे प्रकल्प व्यवस्थापक अरुण कुमार म्हणाले.

त्याचसोबत आयुष्यात एकदाच येणारे हे आव्हान यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य केले. साइट आणि मुख्य कार्यालयातील आमच्या सहकाऱ्यांव्यतिरिक्त, आम्ही आमच्या तयारीचे गंभीरपणे पुनरावलोकन करण्यासाठी आमच्या चेनाब रेल्वे ब्रिज प्रकल्पाकडून तज्ञांची मदत घेतली. मनुष्यबळ आणि यंत्रे अभूतपूर्व वेगाने एकत्रित करण्यात आली असे प्रकल्प नियंत्रक अमरसिंह राऊत यांनी सांगितले.

ठळक वैशिष्ट्येआशियातील सर्वात लांब डबल-डेकर व्हायाडक्ट बांधला आहे.पहिला स्तर राष्ट्रीय महामार्गासाठी तर दुसरा स्तर मेट्रोसाठी असेलचार-स्तरीय वाहतूक कॉरिडॉर गड्डीगोदाम क्रॉसिंग येथे आहेयामध्ये वाहन आणि पादचारी भुयारी मार्ग, रेल्वे मार्ग, राष्ट्रीय महामार्ग आणि मेट्रो यांचा समावेश असेल.ही अनोखी व्यवस्था ५.३ किमी मेट्रो-कम-राष्ट्रीय महामार्ग डबल-डेकर व्हायाडक्टचा भाग आहे.भारतीय रेल्वेत पहिल्यांदाच १८.९ मीटर रुंद स्टील गर्डरचे २८ मीटर उंचीवर थेट रेल्वे रुळांवर लाँचिंग करण्यात आले आहे.