शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
3
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
4
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
5
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
8
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
9
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
10
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
11
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
12
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
13
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
14
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
15
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
16
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
17
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
18
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
19
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
20
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेची शाळा पडल्याने मुख्याध्यापकाच्या घरीच भरतात वर्ग; दुर्गम भागात शिक्षणाची दुरवस्था

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2022 10:36 IST

जिल्ह्याच्या अहेरी तालुक्यातील सिंधा गावात असलेल्या एकशिक्षकी शाळेच्या इमारतीची चांगलीच दुरवस्था झाली आहे.

देचलीपेठा (जि. गडचिरोली) : जिल्ह्याच्या अहेरी तालुक्यातील सिंधा गावात असलेल्या एकशिक्षकी शाळेच्या इमारतीची चांगलीच दुरवस्था झाली आहे. त्यामुळे शाळेच्या मुख्याध्यापकाला चक्क स्वत:च्या निवासस्थानी शाळा भरवावी लागत आहे. यावरून दुर्गम भागातील शाळा इमारतींची काय अवस्था असेल, याचा प्रत्यय यातून येतो. 

दरम्यान जुनी झालेली ती शाळा इमारत पाडून त्या ठिकाणी नवीन इमारत बांधण्याबाबतचा प्रस्ताव गटशिक्षणाधिकाऱ्यांनी जि.प. प्रशासनाकडे पाठविला असून त्यावर सकारात्मक प्रतिसादही त्यांना मिळाला आहे. अहेरी तालुक्यातील देचलीपेठा केंद्रांतर्गत सिंधा या छोट्याशा गावात अनेक वर्षांपासून ही एकशिक्षकी शाळा आहे. या शाळेत वर्ग १ ते ४ पर्यंतचे १२ विद्यार्थी आहेत. यावर्षीच्या पहिल्याच पावसात शाळेच्या जीर्ण झालेल्या छताचा काही भाग आणि व्हरांड्याचा काही भाग कोसळला. वर्गात घुशींनी घर करत माती उकरून काढली आहे. त्यामुळे सरपटणाऱ्या प्राण्यांचाही वावर असून त्या ठिकाणी बसणे विद्यार्थ्यांसाठी धोकादायक ठरू शकते.

...अन् निवासस्थानावर लागला शाळेचा फलकवर्गखोलीची दुरवस्था पाहता गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार मुख्याध्यापक डंबाजी गडगिलवार यांनी काही दिवस गावातील समाज मंदिरात शाळा भरविली. पण, त्या ठिकाणी कार्यक्रमासाठी वापरली जाणारी भांडीकुंडी ठेवलेली असल्याने ती कोणी उचलून नेऊ नये म्हणून मुख्याध्यापकानी गावातील आपल्या भाड्याच्या खाेेलीतच शाळा भरवणे सुरू केले. खोलीच्या बाहेरच शाळेचा फलकही टांगला आहे.

या एकशिक्षकी शाळेची कौलारू इमारत खूप जुनी आहे. त्या इमारतीची दुरुस्ती करणे शक्य नाही. त्यामुळे नवीन शाळा बांधकामासाठी जुलै महिन्यात प्रस्ताव पाठविला आहे. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी त्याबाबत सकारात्मक प्रतिसादही दिला आहे. पण, तोपर्यंत मुख्याध्यापकाच्या घरी शाळा भरविण्याची पर्यायी व्यवस्था केली आहे.- अर्चना वैद्य, गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती-अहेरी

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली