दीपक भातुसेलोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यातील २९ निवडणुकांची महानगरपालिकांच्या घोषणा होताच युती आणि आघाडीमधील राजकारण तापू लागले आहे. महायुतीतील तीन पक्ष कुठे एकत्र तर कुठे एकमेकांविरोधात उभे ठाकणार आहेत. तर महाविकास आघाडीतही तिच परिस्थिती आहे. काही आपवाद वगळता या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी एकत्र असलेली पाहायला मिळणार नाही. तर काही ठिकाणी भाजपविरोधात इतर पक्षांनी एकत्र मोट बांधण्याचीही तयारी ठेवली आहे. नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकीतही हे चित्र पाहायला मिळाले होते.
जिथे भाजपची ताकद आहे, तिथे स्वबळावर आणि जिथे महायुतीतील घटक पक्षांची गरज आहे तिथे घटक पक्षांना सोबत घेऊन लढण्याची रणनीती भाजपने आखली आहे. मुंबई महापालिका भाजपच्या दृष्टीने अत्यंत प्रतिष्ठेची असल्याने इथे शिंदेसेनाला बरोबर घेऊन निवडणूक लढविली जाणार आहे. नागपूर महानगरपालिकेतही शिंदेसेनेसोबत युतीचा भाजपचा निर्णय झाला आहे.
"जिथे भाजप मजबूत आहे तेथे शिंदेसेनाला व जिथे शिंदेसेना मजबूत आहे तेथे भाजपला सोबत घेऊन निवडणूक लढविण्याचा निर्णय वरिष्ठ स्तरावर झाला आहे."
- चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
मनसेमुळे मुंबईत काँग्रेसची 'एकला चलो रे' ची हाक
१. मनसेमुळे काँग्रेसने मुंबईत स्वतंत्र लढणार असल्याचे पुन्हा जाहीर केले आहे. नबाव मलिक यांच्यामुळे भाजप अजित पवार गटापासून अंतर ठेवणार आहे. त्यामुळे मुंबईत अजित पवार गट काय करणार याबाबत उत्सुकता आहे. दुसरीकडे उद्धवसेना-मनसे युतीबरोबर जायचे की काँग्रेसबरोबर राहायचे याबाबत शरद पवार गटाने भूमिका स्पष्ट केलेली नाही.
२. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका अजित पवारांच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. इथे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत, तर पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नाशिक येथे भाजप-शिंदेसेनेची युतीबाबत बोलणी सुरू झाली आहे. नाशिकमध्ये उद्धवसेना आणि मनसे एकत्र येण्याची चिन्हे आहेत.
३. अमरावतीमध्ये महायुती एकत्रित लढेल. रवि राणा यांचा युवा स्वाभिमान 3 पक्ष भाजपसोबत महायुतीत असेल, असा विश्वास भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. मात्र अजित पवार गटाचे आमदार संजय खोडके यांचे रवि राणा यांचे राजकीय वैर असल्याने अमरावतीत महायुती एकत्र लढण्याबाबत प्रश्नचिन्ह आहे.
Web Summary : Maharashtra's political landscape intensifies as upcoming elections prompt shifting alliances. The Mahayuti and Mahavikas Aghadi face internal conflicts and potential disruptions in various regions. Local dynamics and rivalries complicate coalition strategies, impacting election outcomes.
Web Summary : आगामी चुनावों से महाराष्ट्र का राजनीतिक माहौल गरमा गया है, जिससे गठबंधनों में बदलाव हो रहा है। महायुति और महाविकास अघाड़ी को आंतरिक संघर्षों और विभिन्न क्षेत्रों में संभावित व्यवधानों का सामना करना पड़ रहा है। स्थानीय गतिशीलता और प्रतिद्वंद्विता गठबंधन रणनीतियों को जटिल बना रही है, जिससे चुनाव परिणामों पर प्रभाव पड़ रहा है।