शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

अर्णब गोस्वामींचा धमाकेदार कमबॅक, पहिल्याच शोमध्ये लालू प्रसाद यादव टार्गेट

By admin | Updated: May 6, 2017 13:35 IST

आपल्या आक्रमक शैलीमुळे प्रसिद्ध असलेले पत्रकार व टाइम्स नाऊ (TIMES NOW) या वृत्तवाहिनेचे माजी संपादक अर्णब गोस्वामी यांनी "रिपब्लिक" या नवीन वृत्तवाहिनीद्वारे धमाकेदार कमबॅक केले आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 6 - आपल्या आक्रमक शैलीमुळे प्रसिद्ध असलेले पत्रकार व  टाइम्स नाऊ (TIMES NOW) या वृत्तवाहिनेचे माजी संपादक अर्णब गोस्वामी यांनी "रिपब्लिक" या नवीन वृत्तवाहिनीद्वारे धमाकेदार कमबॅक केले आहे. 
 
अर्णब यांची बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित "रिपब्लिक" ही वृत्तवाहिनी शनिवारपासून (6 मे) सुरू झाली.  अर्णब यांनी पहिल्याच दिवशी राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव यांच्यासंदर्भातील मोठा गौप्यस्फोट केला आहे.
 
अर्णब यांनी आपल्या शोमध्ये लालू प्रसाद यादव आणि माफिया डॉन मोहम्मद शहाबुद्दीन कारागृहात असताना (आरजेडीचे माजी खासदार) या दोघांमध्ये झालेल्या संवादाचा मोठा गौप्यस्फोट केला आहे. 
 
"रिपब्लिक" वृत्तवाहिनीनं लालू आणि शहाबुद्दीन या दोघांच्या संवादाची ऑडिओ टेप प्रसिद्ध करण्यात आली आहे. लालू प्रसाद यादव फोनच्या माध्यामातून शहाबुद्दीनसोबत संवाद साधत आहेत, ज्यात दोघांनी एप्रिल 2016 दरम्यान झालेल्या दंगलीसंदर्भात चर्चा केली आहे.
 
"रिपब्लिक"नं लालूंसंदर्भातील एवढा मोठा गौप्यस्फोट केल्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावर असंख्य प्रश्नांचा भडीमार होत आहे. हे सर्व प्रकरण समोर आल्यानंतर नितीशकुमार आरजेडीसोबतची युती मोडणार का? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. 
 
दरम्यान,  गेल्या वर्षभरापासून पत्रकारिता विश्वात अर्णब गोस्वामी यांच्या "रिपब्लिक" वृत्तवाहिनीची प्रचंड चर्चा सुरू होती. अर्णब गोस्वामी यांनी 2016 मध्ये इंग्रजी वृत्तवाहिनी "टाईम्स नाऊ’च्या मुख्य संपादक पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी "रिपब्लिक" वृत्तवाहिनी सुरू करणार असल्याची माहिती दिली होती.  
 
नवीन वृत्तवाहिनी सुरू करण्यासाठी इतका वेळ का लागला, याबद्दलचे अर्णब गोस्वामी यांनी वृत्तवाहिनी सुरू होण्यापूर्वी स्पष्ट केले. यावेळी प्रेक्षकांनी दिलेल्या पाठिंब्याबाबतही गोस्वामी यांनी त्यांचे आभार मानले.