शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

अरुण दातेंचा आवाज हा फक्त त्यांचाच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 04:45 IST

अरुण दाते यांचा व माझा संबंध बऱ्याच वर्षांचा होता. विशेषत: माझ्या चाली व त्यांचा आवाज हे एकत्र जुळून आले होते.

-  यशवंत देवअरुण दाते यांचा व माझा संबंध बऱ्याच वर्षांचा होता. विशेषत: माझ्या चाली व त्यांचा आवाज हे एकत्र जुळून आले होते. अशीच एक कविता होती, मंगेश पाडगावकर यांची अगदी सुरुवातीच्या काळातली. ती कविता मी संगीतबद्ध केली होती, परंतु तिला अरुण दातेंचा आवाज नव्हता. कारण मंगेश पाडगावकर यांची व माझी ओळख त्या आधीची होती, परंतु अरुण दातेंशी तेव्हा माझी भेट झालेली नव्हती. तेव्हा ते इंदूरला राहात होते. अरुण दातेंची आणि त्यांच्या आवाजाची ओळख मला त्या मानाने उशिराच झाली. ही ओळख नंतर झाली खरी, पण जेव्हा ती झाली, तेव्हा फार दृढ झाली, हा भाग निराळा. दातेंचा आवाज हा फक्त त्यांचाच होता, दुसºया कुणाचा नव्हता. हे त्यांच्या गायकीचे वैशिष्ट्य म्हणता येईल. त्यांनी कधी कुणाच्या आवाजाची नक्कल केली नाही आणि तशी ती करण्याची त्यांना गरजही नव्हती. त्यांचा आवाज अतिशय रेशमी होता. स्त्रिया जेव्हा रेशमी वस्त्रे पांघरतात, तेव्हा त्यात एक प्रकारचे वेगळेपण दिसते. तसा त्यांचा आवाज होता. मात्र, त्यात पुरुषीपणा होता. अजूनही ते ठणठणीतपणे गाऊ शकत होते आणि हे सगळे सहज होते, मुद्दाम गाण्यासाठी वगैरे नव्हे. त्यांच्या आवाजात सहजता होती. त्यांनी आयुष्यात जे काही केले ते अगदी सरळ सरळ केले. त्यांनी मुद्दाम असे कधीच काही केले नाही.(शब्दांकन : राज चिंचणकर)

टॅग्स :arun datearun datemusicसंगीत