शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कृत्रिम प्रकल्प म्हणजे विकास हे वैचारिक दारिद्र्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 00:01 IST

विकास असे कोणी म्हणत असेल तर ते वैचारिक दारिद्रयच म्हणावे लागेल, अशी टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाणार प्रकल्पाचा उल्लेख न करता गुरुवारी विधानसभेत केली.

मुंबई : कृत्रिम प्रकल्पांच्या मागे लागताना आपण काय गमावणार अन् काय कमावणार याचाही विचार केला पाहिजे. निसर्गसुंदर कोकणात कृत्रिम प्रकल्प म्हणजे विकास असे कोणी म्हणत असेल तर ते वैचारिक दारिद्रयच म्हणावे लागेल, अशी टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाणार प्रकल्पाचा उल्लेख न करता गुरुवारी विधानसभेत केली.कोकणच्या विकासासाठी नियम २९३ अन्वये उपस्थित करण्यात आलेल्या प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, कोकणचे निसर्गसुंदर वैभव टिकविण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. कृत्रिम प्रकल्पांना विकास मानून जर आपण हे वैभव घालवणार असू तर त्यासारखे दुसरे वैचारिक दारिद्रय नाही.कोकणच्या विकासासाठी सिंधुरत्न समृदधी विकास योजना सुरू करण्यात आली आहे.येत्या १ मे या महाराष्ट्रदिनी चिपी विमानतळ कोणत्याही परिस्थितीत सुरू करण्याच्या सूचना मी दिल्या आहेत.त्याचसोबत एलईडी लाईटद्वारे सुरू असणारी मासेमारी बंद करणारा राज्याचा कायदा आणण्यात येईल.पाणबुडीच्या माध्यमातून मरीन लाईफ दाखविण्याची योजना सुरू करण्यासोबतच कोकणातील जलदुर्ग दाखविणारी समुद्री सफर देखील सुरू करण्यात येणार असल्याच्या घोषणा मुख्यमंत्र्यांनी केल्या.कोस्टगार्ड,पोलीस आदींना खोल समुद्रात चालणारी मासेमारी रोखण्यासाठी सांगण्यात आले आहे.मत्स्यदुष्काळ आदी प्रश्न सोडवण्यात येतील.डिझेलचे परतावे देण्यास सुरूवातही झाली आहे.समुद्री महामार्गाचे काम जलदगतीने पुढे नेण्यात येत आहे.तसेच प्रधानमंत्री जलमिशन योजना थांबवण्यात आलेली नाही.नळाद्वारे जलजोडणीचे काम सुरू आहे.त्याचसोबत चिपी येथील विमानतळावर उपकरणे बसविण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.आंबा-काजू बोर्डाच्या समस्याही सोडविण्यात येणार आहेत.येत्या एप्रिल महिन्यात कोकणात व्हायरॉलॉजी प्रयोगशाळा देखील सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.>मरिनलाइफसाठी पाणबुडीकोकणात मरिनलाइफचा आनंद लुटण्यासाठी पाणबुडी सुरू करण्यात येणार आहे. देशातील अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयोग असेल. मुंबईजवळच्या एलिफंटा बेटापासून ते या सर्व जलदुर्गांची बोटीतून सफर घडविणारा प्रकल्प सुरू करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.