शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

तरुणाईचा कलाविष्कार बहरला

By admin | Updated: February 12, 2017 00:20 IST

उत्साह कायम : शिवाजी विद्यापीठाचा परिसर फुलला-खुलला

कोल्हापूर : टाळ्या-शिट्ट्यांचा गजर, प्रतिसादाची साद, सातत्यपूर्ण जल्लोष, कलेच्या देखण्या सादरीकरणाला उत्स्फूर्तपणे मिळणारी वाहवा अशा जोशपूर्ण वातावरणात ‘शिवोत्सव’ या ३२व्या राष्ट्रीय आंतरविद्यापीठीय युवा महोत्सवाचा दुसरा दिवस रंगला. तरुणाईचा कलाविष्कार फुलला-खुलला आणि विद्यापीठाचा अख्खा परिसर शनिवारी सांस्कृतिक कलेच्या प्रेमात पडला.देशाच्या विविध भागांतून हजारो मैलांचा प्रवास करून सुमारे १३०० विद्यार्थी कलाकार शिवाजी विद्यापीठात दाखल झाले आहेत. जल्लोषी वातावरण, सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडविणाऱ्या शोभायात्रेने महोत्सवाचा शुक्रवारी प्रारंभ झाला. महोत्सवातील शनिवारची सकाळ शास्त्रीय सूरवादनाने झाली. प्रश्नमंजूषा, पोस्टर मेकिंगवर एक नजर टाकून युवक-युवतींनी पाश्चिमात्य समूहगायन ऐकण्यासाठी दुपारी लोककला केंद्रात हजेरी लावली. तब्बल दोन तास त्यांना पाश्चिमात्य समूहगीतांच्या सादरीकरणाने उपस्थित तरुणाईला ताल धरायला लावला. काहींनी वक्तृत्वातून ‘स्वच्छ भारत’ची मते जाणून घेतली, तर काहींनी कोलाजमधील पर्यावरण रक्षणाचा संदेश जाणून घेतला. लोककला वाद्यवृंदाचे सादरीकरण पाहण्यासाठी सायंकाळी पाच वाजल्यापासून तरुणाईची पावले लोककला केंद्राकडे वळू लागली. काही वेळातच तरुणाईच्या गर्दीने केंद्र हाऊसफुल्ल झाले. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास गुजरातमधील भावनगरच्या महाराजा कृष्णकुमारसिंहजी विद्यापीठाच्या संघाने लोककला वाद्यवृंदाच्या सादरीकरणाची सुरुवात केली. पारंपरिक गुजराती वेशभूषेत त्यांनी दमदार सादरीकरण केले. गुवाहाटी विद्यापीठाने आसामच्या लोकसंगीताची सफर घडविली. केरळच्या कालिकत विद्यापीठाने उपस्थितांना नृत्याचा ठेका धरायला लावले. विद्यासागर विद्यापीठाने पश्चिम बंगालची कला-संस्कृती व्यासपीठावर साकारली. गुजरात विद्यापीठाने कार्यक्रमाची रंगत वाढविली. तीन तासांहून अधिक वेळ लोककला वाद्यवृंदाच्या सादरीकरणाने महोत्सवात उत्साह भरला. यात १४ संघ सहभागी झाले होते. दरम्यान, शनिवारी दुपारी काही संघ विद्यापीठात दाखल झाले. यात काश्मीर विद्यापीठ, छत्रपती शाहूजी युनिव्हर्सिटी कानपूर, माखनलाल चतुर्वेदी युनिव्हर्सिटी आॅफ जर्नालिझम अ‍ॅँड कम्युनिकेशन, भोपाळ, आदींचा समावेश होता. ‘शिवोत्सव’मधील सहभागी संघांची संख्या ७९वर पोहोचली आहे. (प्रतिनिधी) रांगड्या परंपरेचे दर्शनमहोत्सवात शनिवारची सायंकाळ लोककला वाद्यवृंदाने रंगली. यात संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, मुंबई विद्यापीठांनी महाराष्ट्राच्या रांगड्या परंपरेचे दर्शन घडविले. त्यांनी भूपाळी ते लावणीपर्यंतच्या संगीताचे सादरीकरणाने उपस्थितांना डोलायला लावले. त्यांच्या सादरीकरणाला उपस्थित टाळ्या, शिट्ट्यांच्या गजरात दाद देत होते. काहींना तर नृत्य करण्याचा मोह आवरता आला नाही.