शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
2
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
3
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
4
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
5
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
6
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
7
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
8
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
9
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
10
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
11
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
12
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
13
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
14
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
15
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
16
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
17
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
18
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
19
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
20
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!

पालिका सभागृहातील गैरवर्तणुकीला बसणार चाप

By admin | Updated: July 29, 2016 01:50 IST

नागरी समस्यांवर आवाज उठविण्यासाठी वक्तृत्त्वापेक्षा ताकदीचा वापर नगरसेवक करु लागले आहेत़ त्यामुळे शाब्दिक बाचाबाचीचे रुपांतर आता हाणामारीच्या प्रसंगामध्ये होऊ लागले आहे़

मुंबई: नागरी समस्यांवर आवाज उठविण्यासाठी वक्तृत्त्वापेक्षा ताकदीचा वापर नगरसेवक करु लागले आहेत़ त्यामुळे शाब्दिक बाचाबाचीचे रुपांतर आता हाणामारीच्या प्रसंगामध्ये होऊ लागले आहे़ याची गंभीर दखल घेत या ऐतिहासिक सभागृहाचा मान राखण्यासाठी नगरसेवकांना आचारसंहिता लागू करण्याचा प्रस्ताव खुद्द आयुक्त अजय मेहता यांनी सर्वपक्षीय गटनेत्यांपुढे ठेवला आहे़ त्यानुसार बेशिस्त नगरसेवकाला सभागृहाबाहेर काढणे तर वेळ पडल्यास त्यांचे पद रद्द करण्याची शिफारसच त्यांनी केली आहे़ पालिका महासभेच्या माध्यमातून नगरसेवकांना नागरी समस्यांवर प्रशासनाला जाब विचारता येत असतो़ मात्र गेल्या काही वर्षांमध्ये पालिका महासभेतील चर्चेचा स्तर खालावला आहे़ नगरसेवकांमध्ये हाणामारीचे प्रसंग वारंवार घडू लागले आहेत़ देवनार कचरा समस्येवर प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी महापौर व आयुक्तांच्या दिशेने कचरा भिरकवला़ हा प्रसंग सभागृहात बसलेल्या अन्य सदस्यांसाठी नित्यनेहमाचा असेल़ मात्र आयुक्तांनी याची गंभीर दखल घेऊन नगरसेवकांसाठी आचारसंहिता तयार करण्याचा निर्धार केला आहे़ बेशिस्त व गैरवर्तणुक करणाऱ्या सदस्याला सभागृहाबाहेर काढण्याचे अधिकार महापौरांना असतात़ मात्र नगरसेवक या कारवाईला जुमानत नसल्याने महापौरांचा अवमान होत आहे़ त्यामुळे पालिका सभागृहातही शिस्तीचे पालन होण्यासाठी आचारसंहितेचा मसुदाही आयुक्तांनी तयार केला आहे़ (प्रतिनिधी)अशी असेल आचारसंहिता- निलंबित केल्यानंतरही सदस्य सभागृहाच्या बाहेर जात नसल्यास पीठासीन अधिकारी मार्शल्सची मदत घेऊन नगरसेवकाला बाहेर काढू शकतात़ - बेशिस्तांना इतर समित्यांच्या कामकाजातही भाग घेण्यास प्रतिबंध करण्यात यावा़- प्रतिस्पर्धी बाकावरील नगरसेवकांना बोलण्याची संधी मिळू नये, यासाठी बऱ्याचवेळा नगरसेवक सभागृहात शिटी आणून वाजवितात़ तर काहीवेळा कचरा आणणे, दूषित पाण्याची बाटली आणणे असे प्रकार घडतात़ सभागृहात अशा कोणत्याही वस्तू आणण्यास बंदी घालण्यात यावी़ तसेच नगरसेवकांच्या तपासणीची प्रवेशद्वारावरील सुरक्षा रक्षकाला परवानगी द्यावी़- सभागृहात खणखणारे मोबाईलचे आवाज बंद करण्यासाठी जॅमर बसविण्यात यावे़ तसेच अशोभनीय वर्तणुकीबद्दल संबंधित नगरसेवकाचे पद रद्द करण्याचा ठराव पालिका महासभेत मंजूर करुन राज्य शासनाकडे पाठविण्यात यावा़- सभागृहाची प्रतिष्ठा राखणे व पीठासीन अधिकाऱ्याचा आदर करणार असे शपथपत्रच नगरसेवकांकडून घेणे़