शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

रायफल बाळगणाऱ्यास अटक

By admin | Updated: October 31, 2016 02:05 IST

अटी व शर्तीचा भंग करत रायफल बाळगणाऱ्यास एपीएमसी पोलिसांनी अटक केली आहे.

नवी मुंबई : अटी व शर्तीचा भंग करत रायफल बाळगणाऱ्यास एपीएमसी पोलिसांनी अटक केली आहे. ही व्यक्ती मूळ जम्मूची असुन काही महिन्यांपासून सानपाडा येथे रहायला आहे. त्याने नवी मुंबई पोलिसांची परवानगी न घेताच रायफल बाळगली होती. एपीएमसी आवारात फिरणाऱ्या एका व्यक्तीकडे रायफल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचला होता. यावेळी एका व्यक्तीच्या कारची झडती घेतली असता, त्याच्याकडे अद्ययावत रायफल व १५ काडतुसे आढळून आली. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता रायफल त्याने जम्मू येथून आणल्याचे समजले. शिवाय शस्त्र बाळगण्याचा जम्मू पोलिसांचा परवाना असल्याचेही स्पस्ट झाले. मात्र नवी मुंबईत वास्तव्याला आल्यानंतर ३० दिवसात त्यांनी स्थानिक पोलिसांना शस्त्राची माहिती देऊन परवानगी घेण्याची आवश्यकता होती. मात्र नवी मुंबई पोलिसांची परवानगी न घेता रायफल बाळगली होती. सदर व्यक्ती व्यापारी असून स्वत:च्या सुरक्षेसाठी हे शस्त्र वापरत असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले आहे. त्याच्याविरोधात एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. त्याच्याकडील परवाना खरा आहे की खोटा हेही तपासले जाणार असल्याचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र गलांडे यांनी सांगितले.