नाशिक : कराराने अदलाबदल केलेल्या शेतजमिनीच्या सातबारा उताºयावर पिकपेºयाची नोंद करण्यासाठी पाचशे रुपयांची लाच स्वीकारतांना नानेगाव येथील तलाठी सुनील अमृत चांडोले यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी (दि़४) रंगेहाथ पकडले़लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक विश्वजीत जाधव यांन दिलेल्या माहितीनुसार तक्रारदाराने आपली शेतजमिनीची कराराने अदलाबदल केली होती़ या जमिनीच्या सातबारावर पिकपेºयाची नोंद करण्यासाठी चौदा नंबरचा फॉर्म भरून तो नाशिक तहसिल कार्यालयात पाठविण्यासाठी नानेगावचे तलाठी सुनील चांडोले यांनी तक्रारदाराकडे दोन हजार रुपये लाचेची मागणी केली तर तडजोडीअंती पाचशे रुपये ठरविण्यात आले़ याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली असता बुधवारी सापळा लावण्यात आला़ तलाठी चांडोले यांनी तक्रारदाराकडून पाचशे रुपये घेताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले़दरम्यान, या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते़
नानेगावच्या लाचखोर तलाठयास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 20:17 IST
नाशिक : कराराने अदलाबदल केलेल्या शेतजमिनीच्या सातबारा उताºयावर पिकपेºयाची नोंद करण्यासाठी पाचशे रुपयांची लाच स्वीकारतांना नानेगाव येथील तलाठी सुनील अमृत चांडोले यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी (दि़४) रंगेहाथ पकडले़लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक विश्वजीत जाधव यांन दिलेल्या माहितीनुसार तक्रारदाराने आपली शेतजमिनीची कराराने अदलाबदल केली होती़ या जमिनीच्या सातबारावर पिकपेºयाची नोंद करण्यासाठी ...
नानेगावच्या लाचखोर तलाठयास अटक
ठळक मुद्देसातबारा उताºयावर पिकपेºयाची नोंद करण्यासाठी लाच दोन हजार रुपये लाचेची मागणी; तडजोडीअंती पाचशे रुपये पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू